व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अपेक्षित हुंडा न मिळाल्याने सासरच्यांनी केला छळ, त्रासाला कंटाळून नवविवाहितेची आत्म’हत्या, मावळमधील धक्कादायक प्रकार!

सहा ते सात महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने गळफास घेऊन आत्म'हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मावळ तालुक्यात घडला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 26, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Lonavla-City-Police-Station

Photo Courtesy : File Photo : Lonavla City Police Station


सहा ते सात महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने गळफास घेऊन आत्म’हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मावळ तालुक्यात घडला आहे. सदर मुलीच्या आत्म’हत्येनंतर तिच्या वडीलांनी याबाबत लोणावळा शहर पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून मयत मुलीचा नवरा, सासरा, सासू आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पोलिसांनी मुलीचा नवरा अथर्व कांबळे, मुलीचा सासरा महेश कांबळे आणि मुलीची सासू व नंणद यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. सर्वजण लोणावळा शहरातील रहिवासी आहे. त्यांच्यावर भा.द.वि.क. 498 (अ ), 304 (ब ) 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( dowry case newly married girl suicide in lonavala )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लग्नांतर मुलीचा पती, सासरा, सासू आणि नणंद यांनी वेळोवेळी मुलीला कपड्यावरून, बोलण्यावरून सतत टोमणे देऊन तसेच लग्नामध्ये मानपान केला नसल्याच्या कारणावरून आणि लग्नात पाहिजे तेवढा हुंडा दिला नाही, अजून हुंडा आई-वडिलांकडून घेऊन ये, असे सतत बोलून मुलीला शारिरीक आणि मानसिक त्रास देत तिचा छळ केला होता, असे फिर्यादीत नमूद आहे.

तसेच यामुळेच मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केले आणि तिच्या मयतास कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी अटकेत आहेत. वडगांव मावळ न्यायालयात आरोपींना हजर केले असता त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि पोवार लोणावळा करत आहेत.

अधिक वाचा –
– पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर प्रशासनाचे कठोर पाऊल ! तब्बल 32 रूफटॉप, पब आणि बार केले सील । Pune News
– धक्कादायक ! मैदानावर क्रिकेट खेळत असताना हार्ट अटॅक आल्याने मावळ तालुक्यातील क्रिकेटपटूचे निधन । Maval News
– शाब्बास आर्यन ! लोणावळ्याचा आर्यन दळवी गणित विषयात राज्यात प्रथम, अभिनंदनाचा होतोय वर्षाव । Lonavala News


dainik maval jahirat

Previous Post

गाव करी ते राव काय करी ! कुसगाव ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या पवित्र्याने प्रशासनाची धावपळ, 10 जूनपर्यंत योजना पूर्ण करण्याचे आश्वासन

Next Post

महत्वाची बातमी ! बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीचे 27 मे पासून अर्ज भरता येणार, वाचा अधिक

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
SSC HSC Exam Image

महत्वाची बातमी ! बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीचे 27 मे पासून अर्ज भरता येणार, वाचा अधिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Issue of Patan landslide victims raised directly with Minister girish mahajan through Bala Bhegade initiative

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर ; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने बाधितांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला निवेदन

August 7, 2026
Vadgaon Maval Demand for installation of CCTV cameras an open gym at Morya Chowk in Dhorewada

वडगाव मावळ : ढोरेवाडा येथील मोरया चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ओपन जीम उभारण्याची मागणी

August 7, 2026
NCP protests in Talegaon Dabhade against alleged remarks made about DCM Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

August 7, 2026
Setback for NCP in Talegaon Dabhade city Majnu Natekar councilor membership cancelled

तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द

August 7, 2026
Major achievement by Lonavala Police Stolen property seized accused arrested from Kalyan

लोणावळा पोलिसांची मोठी कामगिरी ; २.२९ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त, आरोपीला कल्याणमधून अटक

August 7, 2026
Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.