लोकसभा निवडणूक 2024 चे मतदान पूर्ण झाल्यानंतर आज (दि. 4 जून) देशभरात सर्व ठिकाणच्या मतदारसंघातील मतमोजणी होत आहे. प्राथमिक कल हाती येत असून पहिल्या फेरीची मतमोजणी देखील पूर्ण झाली आहे. देशभरातील कल पाहता एनडीए ला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. परंतू इंडिया आघाडीने मारलेली मुसंडी देखील मोठी आहे. अशात सर्व भाजपा कार्यकर्त्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
भाजपाचे प्रमुख तथा पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे स्वतः पिछाडीवर असल्याचे समजत आहे. नरेंद्र मोदी हे 6223 मतांनी पिछाडीवर असल्याचे समजत आहे. उत्तर प्रदेशच्या वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदी निवडणूक लढवत आहेत. यात नरेंद्र मोदी यांच्या समोर काँग्रेसचे अजय राय यांचे आव्हान होते. मतमोजणीत अजय राय यांनी मोठी आघाडी घेतल्याचे दिसत आहे. पहिल्या फेरीनंतर अजय राय यांना 11480 मते पडले असून नरेंद्र मोदी यांना फक्त 5227 मते पडली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मधून तब्बल ६ हजार मतांनी पिछाडीवर.
-ECI नुसार
— Pawan/पवन (@thepawanupdates) June 4, 2024
सद्य स्थितीत नरेंद्र मोदी पिछाडीवर आहेत. तब्बल 6223 मतांनी काँग्रेस उमेदवार आघाडीवर असून नरेंद्र मोदी पिछाडीवर आहेत. भाजपासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही आकडेवारी दिलेली आहे.
अधिक वाचा –
– मावळ लोकसभा निकाल Live : पहिल्या फेरीत श्रीरंग बारणेंची मुसंडी, संजोग वाघेरेंना मागे टाकत घेतली मोठी आघाडी, वाचा एका क्लिकवर । Maval Lok Sabha
– बालेवाडी येथे मतमोजणी ! निकालासाठी जाणारे कार्यकर्ते आणि सामान्यांसाठी महत्वाची अपडेट, वाहतूक मार्गात मोठा बदल, जाणून घ्या
– महत्वाची बातमी ! नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार