मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे बहुमताने विजयी झाले आहेत. सलग तिसऱ्यांदा शिवसेनेच्या धनुष्यबाणावर श्रीरंग बारणे हे विजयी होऊन दिल्लीत जात आहेत. अत्यंत अटीतटीच्या समजल्या जाणाऱ्या मावळ लोकसभेत तशी काँटे की टक्कर होईल असे वाटत होते. परंतू पहिल्या फेरीपासून श्रीरंग बारणे आघाडीवर राहिले. त्यांची आघाडी संजोग वाघेरे यांना मोडता आली नाही. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ लोकसभेत यंदाही दणदणीत विजय मिळवत श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा खासदार बनले आहेत. तब्बल सव्वा लाखांच्या फरकाने श्रीरंग बारणे विजयी झाल्याची माहिती मिळत आहेत. तर कुठल्याही फेरीत अपेक्षित मते न मिळाल्याने, आणि अपेक्षित मतदारसंघात लीड म मिळत गेल्याने मोठ्या फरकाने संजोग वाघेरे यांचा मावळ लोकसभेत पराभव झाला आहे. ( Lok Sabha Election 2024 Result Shrirang Barane won from Maval Constituency Sanjog Waghere defeated )
श्रीरंग बारणे यांनी मतदान झालेच्या दिवसापासूनच आपल्या विजयाची खात्री व्यक्त केली होती. तब्बल अडीच लाखांच्या फरकाने आपण निवडून येवू असा विश्वास त्यांना होता. परंतू संजोग वाघेरे यांनी त्यांना कडवी झुंज दिली. त्यामुळे अडीच लाखांचे लीड ते मिळवू शकले नाहीत. परंतू लाखाहून अधिकच्या फरकाने श्रीरंग बारणे हे पुन्हा खासदार बनले आहेत. यासह श्रीरंग बारणे यांनी त्यांच्या खासदारकीची हॅटट्रीक पूर्ण केली आहे. त्यांच्या विजयाचा जल्लोष आता सुरू असून कार्यकर्ते गुलालात न्हावून निघाले आहेत.
अधिक वाचा –
– भाजपाचे ‘अब की बार 400 पार’ चं स्वप्न भंगणार ? इंडिया आघाडीची जोरदार मुसंडी, काँग्रेसचं दिमाखात कमबॅक । Lok Sabha Result 2024
– मावळ लोकसभा निकाल : 5 फेऱ्या पूर्ण, श्रीरंग बारणेंकडे 29,536 मतांची आघाडी, आतापर्यंत कुणाला किती मतदान? पाहा आकडेवारी
– लोकसभा निवडणूक निकाल : महाराष्ट्रात महाविकासआघाडीने दाखवली आपली ताकद ! महायुतीचं 45 पारचं स्वप्न लांब राहिलं