Lok Sabha Election 2024 Results Winning MP from Maharashtra : लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी अखेर ऐतिहासिक निकालाने आता थंडावली आहे. देशात एनडीएचे सरकार पुन्हा सत्तेत येत असले तरीही इंडिया आघाडीने मारलेली मुसंडी सर्वांसाठी चर्चेची बाब बनली आहे. यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र राज्याचा कौल हा देशासाठी निर्णायक ठरला आहे. महाराष्ट्रात तर महायुतीला मतदारांनी जोरदार चपराक दिली आहे. महाविकासआघाडीच्या उमेदवारांच्या पारड्यात भरघोस मतांचे दान मतदारांनी टाकले, त्यामुळे महायुतीचे 45 पारचे स्वप्नही भंगले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
राज्यातील एकूण 48 जागांवरचा अंतिम निकाल आता जाहीर झाला आहे. अंतिम निकालाकडे पाहिल्यास महाराष्ट्रातील जनतेचा कौल हा महाविकासआघाडी्च्या बाजूने असलेला दिसतो, याची कारणंही अनेक आहेत. एकूण 48 जागांपैकी काँग्रेस हा 13 जागांसह राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला आहे, ही गोष्टी सर्वांच्याच नजरेत भरणारी आहे. काँग्रेस – 13, शरद पवार गट – 8, शिवसेना उबाठा – 9 अशी महाविकासआघाडीची एकूण 30 जागांवर विजयी पताका फडकली आहे, तर एक अपक्ष उमेदवार विशाल पाटील हेही मविआकडेच असतील, असे त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. ( Lok Sabha Election 2024 Results Winning MP from Maharashtra See Full List )
महायुतीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरीही यंदा भाजपाची झालेली पिछेहाट भाजपासह महायुतीच्या घटकपक्षांनाही धक्का देणारी आहे. भाजपाला यंदाच्या लोकसभेत महाराष्ट्रात अवघ्या 9 जागा मिळाल्या आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 7 जागा मिळाल्या आहेत. महायुतीत आणि महाराष्ट्रात सर्वात मोठी चपराक मतदारांनी कुणाला लगावली असेल, तर ती अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला. राष्ट्रवादीची राज्यात अवघी एकच जागा निवडून आली आहे. त्यामुळे महायुतीचे राज्यातील बलाबल हे सद्यस्थितीत फक्त 17 इतकेच आहे.
महाराष्ट्र राज्य – लोकसभा मतदारसंघ आणि विजयी उमेदवाराचे नाव, पुढे पक्षाचे नाव ;
१. नंदुरबार – गोवाल पाडवी (काॅग्रेस)
२. धुळे – शोभा बच्छाव (काॅंग्रेस)
३. जळगाव – स्मिता वाघ (भाजप)
४. रावेर – रक्षा खडसे (भाजप)
५. बुलढाणा – प्रतापराव जाधव (शिवसेना)
६. अकोला – अनुप धोत्रे (भाजपा)
७. अमरावती – बळवंत वानखेडे (काॅंग्रेस)
८. वर्धा – अमर काळे (शरद पवार)
९. रामटेक – शामकुमार बर्वे (काॅंग्रेस)
१०. नागपूर – नितीन गडकरी (भाजप)
११. भंडारा-गोंदिया – प्रशांत पडोले (काॅग्रेस)
१२. गडचिरोली-चिमूर – नामदेव किरसान (काॅंग्रेस)
१३. चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर (काॅंग्रेस)
१४. यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख (उबाठा)
१५. हिंगोली – नागेश पाटील (उबाठा)
१६. नांदेड – वसंत चव्हाण (काॅंग्रेस)
१७. परभणी – संजय जाधव (उबाठा)
१८. जालना – कल्याण काळे (काॅंग्रेस)
१९. औरंगाबाद – संदीपान भुमरे (शिवसेना)
२०. दिंडोरी – भास्करराव भगरे (शरद पवार)
२१. नाशिक – राजाभाऊ वाझे (शरद पवार)
२२. पालघर – हेमंत सावरा (भाजप)
२३. भिवंडी – बाळ्या मामा (शरद पवार)
२४. कल्याण – श्रीकांत शिंदे (शिवसेना)
२५. ठाणे – नरेश म्हस्के (शिवसेना)
२६. मुंबई उत्तर – पियुष गोयल (भाजप)
२७. मुंबई उत्तर पश्चिम – रवींद्र वायकर (शिवसेना)
२८. मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील (उबाठा)
२९. मुंबई उत्तर मध्य – वर्षा गायकवाड (काॅंग्रेस)
३०. मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई (उबाठा)
३१. मुंबई दक्षिण – अरविंद सावंत (उबाठा)
३२. रायगड – सुनील तटकरे (राष्ट्रवादी)
३३. मावळ – श्रीरंग बारणे (शिवसेना)
३४. पुणे – मुरलीधर मोहोळ (भाजप)
३५. बारामती – सुप्रिया सुळे (शरद पवार)
३६. शिरुर – अमोल कोल्हे (शरद पवार)
३७. अहमदनगर – निलेश लंके (शरद पवार)
३८. शिर्डी – भाऊसाहेब वाघचौरे (उबाठा)
३९. बीड – बजरंग सोनवणे राष्ट्रवादी (एसपी)
४०. उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर (उबाठा)
४१. लातूर – शिवाजी काळगे (काॅंग्रेस)
४२. सोलापूर – प्रणिती शिंदे (काॅंग्रेस)
४३. माढा – धैर्यशील मोहिते (शरद पवार)
४४. सांगली – विशाल पाटील (अपक्ष)
४५. सातारा – उदयनराजे भोसले (भाजप)
४६. रत्नागिरी-सिंधुदुर्ग – नारायण राणे (भाजप)
४७. कोल्हापूर – शाहू महाराज (काॅग्रेस)
४८. हातकणंगले – धैर्यशील माने (शिवसेना)
अंतिम संख्याबळ
भाजप – ९
शिवसेना – ०७
राष्ट्रवादी – ०१
उबाठा – ०९
शरद पवार गट – ०८
काॅंग्रेस – १३
अपक्ष – ०१
एकूण – ४८
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांचा शानदार विजय ; धंगेकर, मोरे पराभूत
– मोठी बातमी ! वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयी, दीड लाखाच्या फरकाने काँग्रेस उमेदवाराचा पराभव । PM Narendra Modi Wins
– आप्पांनी हॅटट्रीक केलीच ! मावळ लोकसभेतून श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय, संजोग वाघेरे यांचा मोठ्या फरकाने पराभव