लोकसभा निवडणूकांचा निकाल आता जाहीर झाला आहे. देशात पुन्हा एकदा एनडीए आघाडीला बहुमत मिळाले आहे. असे असले तरीही भाजपाला एकहाती सत्ता मात्र मिळालेली नाही. देशात इंडिया आघाडीने मोठी मुसंडी मारली असून त्यातही काँग्रेसच्या जागा सर्वाधिक वाढल्या आहेत. एक्झिट पोलमध्ये एनडीए बहुमतात सत्ता स्थापन करेल असा अंदाज होताच, परंतू एक्झिट पोलची आकडेवारी आणि प्रत्यक्ष निकाल यात मोठा फरक दिसत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
- इंडिया आघाडीच्या या यशात राहुल गांधी यांचा मोठा वाटा आहे. प्रत्यक्ष राहुल गांधी हेही दोन मतदारसंघातून विजयी झाले असून मोठ्या फरकाने त्यांनी बाजी मारली आहे. नरेंद्र मोदी यांनीही वाराणसीतून विजयाची हॅटट्रीक केली आहे. असे असले तरीही राहुल गांधी यांचा विजय त्यांच्यापेक्षाही मोठा आहे.
राहुल गांधी यांचा खास पराक्रम ;
काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा इंडिया आघाडीचे प्रमुख नेते राहुल गांधी हे उत्तरप्रदेशातील हायप्रोफाईल मतदारसंघातून अर्थात रायबरेलीतून निवडून आले आहेत. त्यांनी भाजपाचे उमेदवार दिनेश प्रताप सिंग यांचा पराभव केलाय. तसेच राहुल गांधी हे केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून देखील विजयी झालेत. भारतात एकाचवेळी दक्षिण भारत आणि उत्तर भारत अशा दोन टोकांच्या मतदारसंघात विजयी होणारे राहुल गांधी एकमेव खासदार आहे.
मोदींपेक्षाही गांधींचा विजय मोठा ;
नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदारसंघातून तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांचा दीड लाखांच्या फरकाने पराभव केला आहे. मोदींच्या या विजयापेक्षाही राहुल गांधी यांचा विजय मात्र मोठा आहे. रायबरेली लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी हे तब्बल 4 लाख मतांच्या फरकाने विजयी झालेत. तर वायनाडमध्येही राहुल गांधी तब्बल साडेतीन लाखांच्या फरकाने विजयी झाले आहेत. ( Lok Sabha 2024 Result Rahul Gandhi won Wayanad Raebareli by huge margin over Narendra Modi )
राहुल गांधी कोणती जागा सोडणार ?
राहुल गांधी हे एकाच वेळी दोन ठिकाणी निवडून आले आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांना एक जागा सोडावी लागणार आहे. नियमानुसार राहुल गांधी एकाच लोकसभेचे प्रतिनिधित्व करू शकतात. त्यामुळे राहुल हे आता दोन्ही विजयी जागेपैकी एक जागा सोडतील. ते नेमकी कोणती जागा सोडणार याबद्दल माहिती समोर आलेली नाही. मात्र, राहुल गांधी हे रायबरेली मतदारसंघाची जागा सोडू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. रायबरेलीचा वारसा ते प्रियंका गांधी यांच्याकडे सोपवू शकतात, अशी चर्चा होत आहे.
अधिक वाचा –
– आप्पा आले पण कुठून ? श्रीरंग बारणेंना कोणत्या विधानसभेत किती मतदान ? संजोग वाघेरेंनी कुठे दमवलं ? वाचा सविस्तर । Maval Lok Sabha Result
– लोकसभा निवडणूक 2024 निकाल : महाराष्ट्रातील सर्व विजयी खासदारांची यादी वाचा एका क्लिकवर । Winning MP from Maharashtra
– अंतिम निकाल जाहीर ! श्रीरंग बारणे 96 हजार 615 मतांनी विजयी, मावळात कोणत्या उमेदवाराला किती मते? वाचा एका क्लिकवर