महाराष्ट्रात ( Maharashtra ) मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या सर्व बाधितांसाठी शिंदे सरकारने ( Shinde Government ) अधिवेशनापूर्वीच मोठी घोषणा केली होती. त्यानुसार एनडीआरएफच्या नियमांपेक्षा थेट दुप्पट रक्कम मदत म्हणून देण्याचे शिंदे सरकारने घोषित केले होते. त्यानुसार आता राज्यातील एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) आणि देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांच्या नेतृत्वातील सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
जून ते ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे ( Heavy Rain Crop Lost ) शेतपिकांचे आणि शेतजमिनीचे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भामध्ये अतिवृष्टीग्रस्त बाधितांना वाढीव मदत ( Aid To Farmer ) केली जाईल, असे सांगितले होते. त्याप्रमाणे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयही घेण्यात आला होता.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सुमारे 3 हजार 501 कोटी जिल्ह्यांना सुपूर्द
वाढीव मदतीबाबत निर्णयानंतर शासन निर्णय जारी
मुख्यमंत्री श्री @mieknathshinde यांनी अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव मदतीचा दिला होता शब्द
— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) September 10, 2022
त्यानुसार आता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या निधीतून मिळून तब्बल 3 हजार 501 कोटी निधी जिल्ह्यांना देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन विभागाने तसा शासन निर्णय जारी केला आहे.
वाढीव मदतीप्रमाणे जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी 13600 प्रति हेक्टर, बागायत पिकांसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टर अशी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्यात येणार आहे. ( Maharashtra CM Eknath Shinde Government Aid To Farmer After Heavy Rain Crop Lost )
अधिक वाचा –
‘हे असले काही खपवून घेणार नाही’, मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा, दिले मोठे आदेश
महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल; ‘कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो’