Vadgaon Maval Accident : वडगाव शहरातील जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर मातोश्री हॉस्पिटल चौक येथे बुधवारी (दि. 19 जून) घडलेल्या भीषण अपघातात एक महिला ठार झाली असून अनेकजण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे शहरवासियांमध्ये संतापाची एक लाट उसळली असून त्याच पार्श्वभूमीवर अपघात घडलेल्या मातोश्री हॉस्पिटल चौक येथे आज (दि. 20 जून) सर्वपक्षीय व सामान्य नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मातोश्री चौकात यापूर्वी अनेकदा लहान मोठे अपघात घडले होते. तेव्हाही नागरिकांनी आवाज उठवला परंतू एमएसआरडीसी, आयआरबी आणि वाहतूक पोलिसांकडून याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. ज्या उपाययोजना केल्या गेल्या त्या तकलादू होत्या, हे अपघातातून सिद्ध झाले. बुधवारचा अपघात हा तर अक्षरशः काळीज पिळवटून टाकणारा होता. एक सामान्य कुटुंबातील महिला जिचा पती कोरोनात मृत पावला होता, ती या अपघातात बळी गेली आणि तिची तीन लेकरं पोरकी झाली. सोबत अन्य काही नागरिक, बालके जखमी झाली. वाहनांच्या नुकसानीचा तर मुद्दा वेगळाच आहे. ( Vadgaon Maval Accident All Party Rasta Roko Movement Letter To MSRDC IRB & Tehsil Administration )
हा अपघात झाला आणि अपघातस्थळी गर्दी झाली. अवजड वाहनांचा वेग, अनियंत्रित स्कूलबसवाले, वेगमर्यादेसाठी उपाययोजना नसले, रस्त्याच्या बाजूचे अतिक्रमण असे अनेक मुद्दे पुन्हा समोर आले आणि अखेर आज सामन्यांनी एकी करत रास्ता रोको आंदोलन केले. पुन्हा याठिकाणी वाहतूक कोंडी झाली, त्यामुळे प्रशासन जागे होऊन अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आश्वासने दिली व निवेदने स्विकारली.
अपघातग्रस्तांना भरपाई हा मुद्दा आजच्या रास्ता रोकोत होताच सोबत पुन्हा असे अपघात होऊ नये यासाठीही तीव्र स्वरूपात विनंती मागणी करण्यात आली होती. अखेर लाजेखातर का असेना पण एमएसआरडीसी आणि आयआरबी प्रशासनाने तातडीने मातोश्री हॉस्पीटल जवळील चौकात वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी स्पीड रंबल स्ट्रिप टाकल्या. परंतू आता प्रशासनाने एवढ्यावरच न थांबता चौकात नागरिकांना रस्ता क्रॉस करण्यासाठी योग्य उपाय योजने, कायमस्वरूपी वाहतूक पोलिस नियुक्त करणे, पीएमपीएमएल बस आणि स्कूल बसचा थांबा सर्व्हिस रोडवर करणे, अतिक्रमण हटवणे हेही उपाय लवकरात लवकर अंमलात आणणे आवश्यक आहे.
अधिक वाचा –
– इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान तातडीने हाती घ्यावे; रविंद्र भेगडे यांचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन । Maval News
– ‘अमृतवृक्ष आपल्या दारी’ योजनेअंतर्गत मावळ वनविभागाकडून 2 लाख रोपे विक्रीसाठी उपलब्ध; नागरिकांना सवलतीच्या दरात मिळणार रोपे
– ताजे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी मच्छिंद्र केदारी यांची निवड । Maval News