दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमेचे व्रत केले जाते. पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि वैवाहिक जीवन सुखी व्हावे, यासाठी महिलावर्ग वटपौर्णिमेचा उपवास करतात. यंदा शुक्रवारी (दि. 21 जून) वट पौर्णिमा सण साजरा करण्यात आला. वडगाव मावळ शहरात महिला भगिनींनी वडाचे पूजन करत वडाला फेऱ्या मारत उत्साहात वटपौर्णिमा साजरी केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वटपौर्णिमा सणाचे पतीपत्नीच्या नात्यासंबंधी अनेक महत्व आहे. पतीपत्नीचे नाते दृढ व्हावे, ही या सणाची मुळ संकल्पना आहे. त्याचबरोबर भारतीय संस्कृतीत निसर्गाचे असलेले महत्व दाखवणारा देखील हा सण आहे. यादिवशी महिला वडाचे झाड पुजतात. त्याला दोरा बांधून नवऱ्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. वडाचे झाड हे दीर्घायुषी असल्याने त्याची पुजा करण्याची प्रथा सुरू झाली आणि भारतीय संस्कृतीचा हा एक भाग आहे. ( Vat Purnima 2024 celebrated in Vadgaon Maval tulsi plant distribution to 250 women )
वडगाव मावळ शहरात शुक्रवारी वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला. खंडोबा मंदिर चौक येथे असणाऱ्या वडाच्या झाडाची पुजा करण्यासाठी शहरातील महिलांनी मोठी गर्दी केली होती. नटूनथटून आपल्या पतीराजाला दीर्घायुष्य मागण्यासाठी महिला वडाला फेऱ्या मारतानाचे दृष्य सुंदर दिसत होते. या दिवसाचे औचित्य साधत संस्कृतीची जपवणूक आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी माजी नगरसेविका पुजा विशाल वहिले यांच्या माध्यमातून आणि जय मल्हार ग्रुप सहकार्याने आलेल्या 250 महिलांना तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळांची यादी वाचा एका क्लिकवर । List of All Tourist Places In Maval Taluka
– चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांनी डीएपी खतावर अवलंबून न राहता पर्यायी खतांचा वापर करावा – कृषी विभागाचे आवाहन
– थरारक ! तळेगाव दाभाडे शहरात हवेत गोळीबार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण । Talegaon Dabhade