देशात नव्या सरकारची स्थापना झाली असून 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन चालू आहे. अधिवेशनातील पहिल्या दोन दिवसांमध्ये सर्व नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली गेली. मंगळवारी (दि. 25 जून) सायंकाळी लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांची निवड झाली. तर बुधवारी (दि. 26 जून) सकाळी ओम बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तब्बल 48 वर्षांनंतर लोकसभा अध्यक्षांची निवडणूक जाहीर करण्यात आली होती. सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये उपाध्यक्षपदावर असहमती झाल्यानंतर काँग्रेसने केरळमधील खासदार के. सुरेश यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे 1976 नंतर पहिल्यांदाच अशी निवडणूक संसदेत पार पडली. मात्र हंगामी अध्यक्षांनी आवाजी मतदानाद्वारे ओम बिर्ला यांना विजयी घोषित केले. ( BJP MP Om Birla elected as Speaker of the 18th Lok Sabha Rahul Gandhi Leader of Opposition )
संसदेत पाहायला मिळाला दुर्मिळ प्रसंग –
ओम बिर्ला यांची निवड जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या जागेवरून उठून ओम बिर्ला यांच्या जागेवर गेले. तिथे मोदींनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. त्यांच्यात काही बोलणी सुरू होताच पाठीमागून विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेले राहुल गांधी हे देखील ओम बिर्लांचे अभिनंदन करण्यासाठी आले. त्यांना पाहताच मोदींनी हाताने त्यांना पुढे येण्याची विनंती केली. राहुल गांधींनी पुढे होत ओम बिर्ला यांच्याशी हस्तांदोलन केले आणि त्यांना अभिनंदन केले. त्यानंतर लागलीच त्यांनी मोदींकडे पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील राहुल गांधींकडे बघून हसतमुखाने हस्तांदोलन केलं. त्यानंतर दोघांनी ओम बिर्ला यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत सोबत केली.
#WATCH | BJP MP Om Birla occupies the Chair of Lok Sabha Speaker after being elected as the Speaker of the 18th Lok Sabha.
Prime Minister Narendra Modi, LoP Rahul Gandhi and Parliamentary Affairs Minister Kiren Rijiju accompany him to the Chair. pic.twitter.com/zVU0G4yl0d
— ANI (@ANI) June 26, 2024
कोण आहेत ओम बिर्ला?
ओम बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. ते राजस्थानच्या कोटा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. 2014 मध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. बिर्ला यांचा जन्म 1962 साली झाला. 1987 साली कोटा येथील भाजपाच्या युवा शाखेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. त्यापूर्वी 2003 ते 2014 पर्यंत कोटा दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले आणि राजस्थान विधानसभेचे सदस्य म्हणूनही काम केले.
अधिक वाचा –
– दहा हजाराची लाच स्विकारताना तलाठी भाऊसाहेब रंगेहात अटक ! मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना
– आमदारसाहेब..! मावळ तालुक्यातील जलजीवन मिशनची अपूरी कामे आणि रस्त्यांच्या कामातील भ्रष्टाचारावर अधिवेशनात आवाज उठवा
– शिंदे सरकारचा मोठा निर्णय ! आता पीक कर्ज मिळवताना ‘ही’ अट नसणार ; अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना होणार फायदा