व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे येथे आणखीन एका युवकाला पिस्तूलासह अटक । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे शहरातील गुन्हेगारी काही थांबताना आणि कमी होताना दिसत नाही. चालू वर्षात तळेगाव शहरात अनेकवेळा गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 26, 2024
in लोकल, शहर
Crime

File Photo : Crime


तळेगाव दाभाडे शहरातील गुन्हेगारी काही थांबताना आणि कमी होताना दिसत नाही. चालू वर्षात तळेगाव शहरात अनेकवेळा गोळीबाराच्या घटना घडल्या. त्यातही गेल्या आठवड्यात झालेल्या गोळीबाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील रहदारीच्या चौकांमध्ये हवेत गोळीबार करण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकारानंतर तातडीने तपास करत आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पिस्तूले आणि काडतूसे जप्त केली आहेत. त्यानंतर आता आणखीन एका युवकाकडे पिस्तूल मिळून आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

सोमवारी (दि. 24 जून) दुपारच्या सुमारास तळेगाव दाभाडे शहरातील लिंब फाट्यासमोरील सुशीला मंगल कार्यालय येथे पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलिस हवालदार दत्तात्रय बनसुडे (वय 26) यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहित उर्फ बंटी महेंद्र आगळे (वय 26, रा. तळेगाव दाभाडे) याला पोलिसांनी पिस्तूलासह ताब्यात घेतले असून त्याच्यावर प्राप्त फिर्यादीनुसार भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3 (5) सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 37 (1) (3) सह 135 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( youth was arrested with pistol in Talegaon Dabhade )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी लिंब फाटा येथून आरोपीला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ 40 हजार रूपये किंमतीचे एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल तसेच 2 हजार रुपये किमतीची 2 जिवंत काडतूसे मिळून आली आहे. विनापरवाना, बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याने त्यास ताब्यात घेतले असून पुढील तपास पोउपनि कोकाटे हे करत आहेत.

अधिक वाचा –
– आमदारसाहेब..! मावळ तालुक्यातील जलजीवन मिशनची अपूरी कामे आणि रस्त्यांच्या कामातील भ्रष्टाचारावर अधिवेशनात आवाज उठवा
– शिंदे सरकारचा मोठा निर्णय ! आता पीक कर्ज मिळवताना ‘ही’ अट नसणार ; अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना होणार फायदा
– श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या तैलचित्राचे अनावरण । Khashaba Jadhav


dainik maval jahirat

Previous Post

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मावळ तालुक्यातील 278 लाभार्थ्यांना लाभार्थी प्रमाणपत्राचे वाटप । Vadgaon Maval

Next Post

18व्या लोकसभेची स्थापना, ओम बिर्ला सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी, राहुल गांधी विरोधी पक्ष नेता, संसदेने पाहिला दुर्मिळ प्रसंग

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Narendra Modi Rahul Gandhi Om Birla

18व्या लोकसभेची स्थापना, ओम बिर्ला सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी, राहुल गांधी विरोधी पक्ष नेता, संसदेने पाहिला दुर्मिळ प्रसंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.