पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांचा मुद्दा सध्या गाजतो आहे. मावळ तालुक्यात देखील चार शाळा या अनधिकृत असल्याचे तपासणीत समोर आले आहे. मावळ तालुक्यातील संबंधित अनधिकृत शाळांवर कारवाई करावी, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देऊ नये, याबाबत सह्यादी विद्यार्थी अकादमीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. सोबत आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुक्यात एकूण चार शाळा अनधिकृत असल्याचे यादीत समोर आले आहे. यातील दोन शाळा कामशेत भागात, एक गहुंजे आणि एक लोणावळा येथे आहे. या माहितीमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. तालुक्यात चार शाळा अनधिकृत आहेत हे माहिती असून देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली का नाही ? असा सवाल पालक, नागरिक उपस्थित करत आहेत. ( Demand action against unauthorized schools in Maval taluka )
सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ तालुका यांच्या वतीने याबाबतीत गटशिक्षणाधिकारी एस आर वाळुंज यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन देण्यात आले. ज्यात अनधिकृत शाळा चालणाऱ्या प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच शाळा एवढ्या दिवस अनधिकृत आहेत हे माहिती असून देखील त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, संबंधितांवर देखील कारवाई व्हावी आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सोबत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी अन्यथा आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला आहे.
हेही वाचा – पुणे जिल्ह्यात 49 शाळा अनधिकृत, मावळ तालुक्यात 4 शाळा अनधिकृत, पाहा संपूर्ण यादी
मावळ तालुक्यातील अनधिकृत शाळा –
नुकतेच जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग यांच्या वतीने जिल्ह्यातील 50 अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली असून यात मावळमधील 4 शाळांचा समावेश आहे. यात,
1) जीझस क्राईस इंग्लिश मीडियम स्कूल कामशेत
2) श्रेयान इंटरनॅशनल स्कूल साईनगर गहुंजे
3) व्यंकेश्वरा वर्ल्ड नायगाव
4) किंग्ज वे पब्लिक स्कूल रायवुड लोणावळा
या शाळांचा अनधिकृत असेलल्या यादीत समावेश आहे.
अधिक वाचा –
– उपवास म्हणजे काय ? तो का आणि कसा करावा ? आषाढी एकादशीच्या उपवासाचे महत्व, साबुदाणा खिचडी उपवासाला खरंच चालते का ? प्रत्येकाने वाचावा असा लेख
– Ashadhi Ekadashi 2024 : बा विठ्ठला… बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे ! मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठल चरणी साकडे
– सार्वजनिक ठिकाणी हुक्का पिणाऱ्या व्यक्तीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची कडक कारवाई । Lonavala Crime