पवनमावळात महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि तालुका कृषी अधिकारी मावळ तसेच मंडळ कृषि अधिकारी काले कॉलनी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत 10 हेक्टर क्षेत्रावर आणि 25 लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतात 2024-25 या चालू वर्षात चारसूत्री भात लागवड प्रकल्प घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने कडधे येथे लाभार्थी शेतकऱ्यांना आझेटोबॅक्टर, पीएसबी, ट्रायकोड्रामा, बांधावर लागवडीसाठी तूर बियाणे वाटप करून मार्गदर्शन करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मौजे कडधे येथे कृषि विभागाकडून चारसूत्री पीक प्रात्यक्षिक प्रकल्प राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत राबविण्यात येत आहे. भात प्रकल्प हा चारसूत्री लागवड पद्धतीवर आधारित असून त्यामध्ये स्थानिक शेतकऱ्याच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या क्षेत्रावर हा प्रकल्प राबविला जात आहे. ( Charsutri Method Rice Cultivation Project in Kadadhe Village to increase Rice Production )
चारसूत्री प्रकल्पातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर 0.40 हे क्षेत्रावर प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी भात बियाणास बिजप्रक्रिया करून गादीवाफ्यावर रोपवाटिका करून दोरीच्या साहाय्याने 15 बाय 25 से.मी. अंतरावर भात लागवड केल्या आहेत. प्रकल्पाअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना कृषि विभागाकडून आझेटोबॅक्टर, पीएसबी, ट्रायकोड्रामा, बांधावर लागवडीसाठी तूर बियाणे, भात प्रात्यक्षिक प्लॉटला देण्यात आले असल्याची माहिती कृषि सहाय्यक शीतल गिरी यांनी दिली.
कडधे येथील प्रगतशील शेतकरी बबन किसन तुपे, हरिश्चंद्र घरदाळे, राजू खराडे, नारायण किसन तुपे, अमोद अरविंद गांधी, वंदना तुळशीराम यादव, शामराव दामू शिंदे, मारुती नामदेव तुपे या शेतकऱ्यांना निविष्ठा वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन कृषी सहायक शीतल गिरी व शेतकऱ्यांनी केले.
“चारसूत्री पद्धतीत भात रोपे कमी लागत असून भात लावणीस कमी वेळ लागतो व बियाणे कमी लागल्यामुळे बियाणे खर्च ही कमी येतो. यूरिया ब्रिकेट खतामुळे भाताच्या उत्पादनात 2 ते 3 पट वाढ होणार असून कृषी विभागाच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा आम्हा शेतकरयाना निश्चितच फायदा होत आहे.” – भरत नामदेव तुपे, प्रगतशील शेतकरी, मळवंडी ठुले
“सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढविणे, आधुनिक तंत्रज्ञान प्रगतशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रचार व प्रसार करणे, उत्पादन खर्च कमी करणे, भात चारसूत्री पद्धत क्षेत्र वाढविणे. प्रकल्प राबविण्याचा मुख्य उद्देश आहे. चारसूत्री लागवड तज्ञ शेतकरी तयार करणे.” – शीतल गिरी, कृषि सहाय्यक, कडधे
अधिक वाचा –
– तळेगावची वैष्णवी मखर बनली सीए, बारावीपासूनचे स्वप्न केले साकार । Talegaon Dabhade
– विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, अनधिकृत शाळांवर कारवाई करावी ; सह्याद्री विद्यार्थी अकादमीचे निवदेन । Maval News
– दिवंगत शिवसैनिक उमेश भाई शेट्टी आणि शंकर मोरे यांच्या पुण्यतिथी निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार । Lonavala News