Dainik Maval News : कामशेत येथे एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. कोंडिबा गबाजी रोकडे (वय 62 वर्षे, रा. कामशेत) यांनी याप्रकरणी कामशेत ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कामशेत पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपी विरोधात भा. न्याय संहिता कायदा कलम 331(3),331(4),305(A),303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.19 जुलै) रात्री 11.00 ते शनिवार (दि. 20 जुलै) सकाळी 7 वाजता च्या दरम्यान कामशेत गावचे हद्दीत ग्रीन मीडोज हाउसिंग सोसाईटी येथील फ्लॅट नंबर बी-9 येथे ही घटना घडली. चोरीत, 1,80,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 30,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, 18,000 रुपये किमतीचे चांदीचे शिक्के, 8000 रुपये किमतीचे चांदीचे दागिने, 36,000 रुपये किमतीचे सोन्याची इतर दागिने, 8000 रुपये किमतीची घड्याळे, 23000 रुपये रोख रक्कम, 25000 रुपये किमतीची मोटारसायकल असा एखूण 3 लाख 28 हजार रुपयांचा मुद्दे माल चोरीला गेला आहे.
चोरट्यांनी फिर्यादीत नमुद कालावधीत सदर बंद घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला आणि सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोटार सायकल आणि अन्य मुद्दे माल लंपास केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोसई शेडगे हे करीत आहे. तसेच वरीष्ठ अधिकारी या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. ( Theft in Kamshet city goods worth 3 lakhs looted )
अधिक वाचा –
– कुस्तीमहर्षी भाऊसाहेब कुंभार यांच्या जयंतीनिमित्त खोपोली शहरात भव्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन । Khopoli News
– कामशेत येथील शिबिरात 71 जणांकडून रक्तदान, शंभराहून अधिक नागरिकांची रक्त तपासणी । Maval News
– तुंग किल्ल्यावर घसरून पडल्याने महिलेचा अपघात, सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांकडून तत्काळ मदत । Maval News