Dainik Maval News : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि सोमवारी झालेल्या दमदार पावसामुळे पवन मावळ भागातील पवना धरण 50 टक्के भरले आहे. सोमवारी पवना धरणाच्या पाठीमागील भागात डोंगर भागात आणि सखल भागात देखील दमदार पाऊस झाला, त्यामुळे धरणाच्या जलाशयात पाण्याची जोरात आवक झाली. एकूणच मागील आठवड्या भराच्या मुसळधार पावसाने धरणातील पाणीसाठ्याने पन्नाशी गाठली असून मावळ वासियांसह पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मंगळवारी सकाळी 6 वाजता घेतलेल्या नोंदीनुसार पवना धरणातील पाणीसाठा 49.30 टक्क्यांच्या पार गेला आहे. मंगळवारी दुपारपर्यंत धरण 50 टक्के भरले देखील आहे. मंगळवारी घेतलेल्या आकडेवारीनुसार 24 तासात तब्बल 106 मीमी इतका जोरदार पाऊस नोंदवण्यात आला. त्यामुळे पवना धरणातील पाणीसाठा थेट 49 टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षी आजच्या तारखेला पवना धरणात 56.995 टक्के इतका पाणीसाठा होता. यंदा पाऊस उशीरा सुरू झाला तरीही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. याच प्रमाणात पावसाचा रंगरूप राहिल्यास धरणही लवकर भरू शकते. यामुळे मावळ तालुक्यातील हजारो शेतकरी, नागरिक यांसह पिंपरी चिंचवड शहरवासीयांची चिंता मिटली आहे. ( Due to heavy rain 50 percent water storage in Pavana dam Maval )
अधिक वाचा –
– Breaking : मावळात तिहेरी हत्याकांड ! गर्भपातादरम्यान महिलेचा मृत्यू, मृत महिलेसह दोन जिवंत मुलांना नदीत ढकलले
– कामशेत येथील शिबिरात 71 जणांकडून रक्तदान, शंभराहून अधिक नागरिकांची रक्त तपासणी । Maval News
– तुंग किल्ल्यावर घसरून पडल्याने महिलेचा अपघात, सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांकडून तत्काळ मदत । Maval News