व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिळींब सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी भगवान दरेकर ; चेअरमन, व्हाइस चेअरमन पदाधिकाऱ्यांची देखील बिनविरोध निवड । Maval News

पवन मावळ विभागातील महत्वाच्या शिळींब विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. शिळींब (ता. मावळ) या संस्थेच्या पदाधिकारी आणि तज्ञ संचालक पदाची निवड प्रक्रिया मंगळवारी पुर्ण झाली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 23, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
Shilimb Society Election

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पवन मावळ विभागातील महत्वाच्या शिळींब विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. शिळींब (ता. मावळ) या संस्थेच्या पदाधिकारी आणि तज्ञ संचालक पदाची निवड प्रक्रिया मंगळवारी पुर्ण झाली. यावेळी चेअरमनपदी प्रकाश धनवे, व्हाइस चेअरमन पदी निवृत्ती धनवे आणि तज्ञ संचालक पदी भगवान दरेकर यांची निवड करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सोसायटीच्या मावळत्या चेअरमन बायडाबाई ढमाले आणि व्हाइस चेअरमन गंगाधर जगताप यांनी आपल्या पदाचा ठरविलेला कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त पदासाठी मंगळवारी (दि.२३) गावातील श्री विठ्ठर रुक्मिणी मंदिरातील सभागृहात निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी चेअरमन पदासाठी प्रकाश राघू धनवे यांचा एकमेव अर्ज आला. तसेच व्हाइस चेअरमन पदासाठी निवृत्ती चिंधू धनवे यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे दोघांचीही अनुक्रमे चेअरमन आणि व्हाइस चेअरमनपदी बिनविरोध निवड जाहीर झाली. तसेच यावेळी सर्व संचालकांच्या ठरावानुसार संस्थेच्या तज्ञ संचालक पदी भगवान नारायण दरेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंदार कुलकर्णी यांनी यावेळी कामकाज पाहिले आणि सर्व निवडींची घोषणा केली. रामदास पाठारे यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले. ( Shilimb Society Election Chairman Vice Chairman elected unopposed Bhagwan Darekar as Director )

यावेळी मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर संचालक मंडळ, सुरेश जगताप, जालिंदर ढमाले, सचिन शिंदे, अनिता धनवे, शाम चोरघे, बायडाबाई ढमाले, निवृत्ती कडू, अविनाश शिंदे, मधुकर केदारी, भाऊ शिंदे, बबन आखाडे, गोरख धनवे यांच्या उपस्थितीत आणि सहमतीने या निवड प्रक्रिया पूर्ण झाल्या. चेअरमन, व्हाइस चेअरमन आणि तज्ञ संचालक यांच्या निवडीनंतर उपस्थितांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी, संचालक यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करत मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी आबासाहेब गोणते, नामदेव गोणते, लाला गोणते, भगवान पडवळ, विठ्ठल ढगे, वाघुजी साठे, जगन्नाथ गोणते, बबन शिंदे, सचिन वाळूंज, बबव जाधव, पंडीत जाधव, भरत धनवे, राजू धनवे, कडू सर, विजय नकटी, बाजीराव ढमाले, अंकूश धनवे, बाळासाहेब दरेकर, एकनाथ दरेकर, गावातील ग्रामस्थ, युवक आणि विविध क्षेत्रातील आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– तुंग किल्ल्यावर घसरून पडल्याने महिलेचा अपघात, सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांकडून तत्काळ मदत । Maval News
– Breaking : मावळात तिहेरी हत्याकांड ! गर्भपातादरम्यान महिलेचा मृत्यू, मृत महिलेसह दोन जिवंत मुलांना नदीत ढकलले
– कामशेत येथील शिबिरात 71 जणांकडून रक्तदान, शंभराहून अधिक नागरिकांची रक्त तपासणी । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

पवना धरण 50 टक्के भरले ! मावळवासियांसह पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी । Pavana Dam Rain Updates

Next Post

ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर तळेगाव शहर भाजपा अध्यक्षांचा राजीनामा, कार्यकर्त्यांना धक्का । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Ashok Dabhade talegaon bjp

ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर तळेगाव शहर भाजपा अध्यक्षांचा राजीनामा, कार्यकर्त्यांना धक्का । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.