विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या महिलेचा गर्भपातादरम्यान झालेला मृत्यू, त्यानंतर तिचा मृतदेह नदीत फेकणे आणि सोबत तिच्या दोन जिवंत मुलांना देखील नदीत फेकल्याची संतापजनक घटना मावळ तालुक्यात घडली आहे. या तिहेरी हत्याकांडाने मावळसह संपूर्ण राज्यात खळबळ माजली असून संतापाची लाट निर्माण झाली आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी आरोपी प्रियकर आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. तरीही गुन्ह्यातील क्रौर्य पाहता नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. मावळ तालुक्यातील मुस्लीम समाजाने देखील घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत याबाबत पोलिस आयुक्त आणि तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात मृत महिलेच्या वडिलांनी सोमवारी (दि.22) फिर्याद दिली. या घटनेत 25 वर्षीय विवाहित मुस्लीम महिला, 5 वर्ष आणि 2 वर्षांची तिची मुले यांची हत्या झाली आहे. याप्रकरणी गजेंद्र जगन्नाथ दगडखैर, रविकांत गायकवाड, गर्भपात करणारी एजंट महिला, कळंबोलीमधील संबंधित डॉक्टर आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एमआयडीसी पोलिसांनी आरोपी प्रियकर गजेंद्र दगडखैर आणि त्याचा मित्र रविकांत गायकवाड यांना अटक केली आहे. तसेच सध्या पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन हे इंद्रायणी नदीपात्रात मृतदेह शोधण्याचे काम करत आहेत. ( Maval Taluka Triple Massacre hang accused demand by Muslim community )
दरम्यान या घटनेचा मावळ तालुका मुस्लीम समाजाच्या वतीने पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड तसेच मावळ तहसीलदार यांच्याकडे निवेदनातून तीव्र निषेध करण्यात आला. तपास यंत्रणेत कोणाचाही हस्तक्षेप न करता आरोपींना फाशीची शिक्षा देऊन सदर कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी मुस्लीम समाजाकडून करण्यात आली आहे. यावेळी मुस्लिम समाज ट्रस्ट अध्यक्ष अयुबभाई शिकीलकर, ऍड रियाज तांबोळी, पीडित मुलीचे वडील गुलाम कादर, शहानुर मुलानी, नदीम शेख, मुनीर बेग, सुलेमान कुरेशी, रियाज शेख, साजिद भाई शेख, सोहेल शिकीलकर, मन्सूर शहा, एजाज शिकीलकर, नदीम शेख नालबंद, शहादत सय्यद उपस्थित होते.
अधिक वाचा –
– पवना धरण 50 टक्के भरले ! मावळवासियांसह पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी । Pavana Dam Rain Updates
– मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस, मुख्यमंत्र्यांकडून एक मागणी मान्य
– मावळात तिहेरी हत्याकांड ! गर्भपातादरम्यान महिलेचा मृत्यू, मृत महिलेसह दोन जिवंत मुलांना नदीत ढकलले