Dainik Maval News : संपूर्ण पुणे जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे, यातही डोंगराळ भाग असलेल्या पुण्यातील मावळ, मुळशी तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. अशा पावसाती पावसाळी पर्यटनासाठी घराबाहेर पडणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या ताम्हिणी घाट बाबक महत्वाची माहिती समोर आली आहे. जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशाने ताम्हिणी घाट रस्ता 5 ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. घाट रस्ता खचल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मौजे आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ वरील रस्त्याच्या एका बाजूस अतिवृष्टीमुळे तडा गेल्याने रस्ता खचलेला आहे. नागरिकांची सुरक्षितता तसेच दुर्घटना टाळण्याकरीता शुक्रवारपासून ५ ऑगस्टपर्यंत सदरचा रस्ता बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. ( According to the order of Pune Collector Tamhani Ghat road is closed )
मौजे आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ वरील साखळी क्र.६१/६५० ते ६१/६८० दरम्यान रस्त्याला एका बाजूने अतिवृष्टीमुळे तडा गेला असून रस्ता खचलेला आहे. तसेच सदरचे ठिकाण हे ताम्हिणी घाट वन परिसर क्षेत्रात येते. रस्ता खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे कामे सुरू असून वाहतूक सुरक्षितेच्यादृष्टीने उपाययोजनाही करण्यात येत आहेत. तथापि पुढील काही दिवसात अतिवृष्टीमुळे हा रस्ता खचून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या महामार्गावरुन नियमित वाहतूक ठेवणे धोकादायक आहे तसेच शनिवार व रविवारी ताम्हिणी घाट परिसर क्षेत्रात पर्यटकांची गर्दी लक्षात घेवून राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ रस्ता बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
अधिक वाचा –
– लोणावळेकरांनो काळजी घ्या, पावसाचा जोर वाढलाय, यंदाच्या मोसमात 4000 मिलिमीटर पाऊस पूर्ण, वाचा अधिक । Lonavala Rain Updates
– मावळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जोरदार इन्कमिंग, ग्रामीण भागातील अनेकांचा पक्षप्रवेश, शरद पवारांची घेतली भेट
– मोठी बातमी ! पावसाचा जोर प्रचंड वाढला, पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला, पवना नदीपात्रात 7070 क्युसेक विसर्ग सुरू । Pavana Dam News