मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याकरीता www.ladkibahin.maharashtra.gov.in संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली आहे. या संकेतस्थळावर आपल्याला गाव, वॉर्ड, तालुका निवडता येणे शक्य होणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता यापूर्वी नारी शक्तीदूत ॲपवरुन अर्ज केले असतील त्यांनी पुन्हा या संकेतस्थळावर अर्ज करू नये. अद्यापही अर्ज सादर न केलेल्या २१ ते ६५ वयोगटातील महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन श्रीमती रंधवे यांनी केले आहे. ( Important New website launched for Majhi Ladki Bahin Yojana check link )
माझी लाडकी बहीण योजना –
महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे. 1 जुलै 2024 पासून ही योजना लागू करण्यात आली असून, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार 21 ते 65 वयोगटातील महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये आर्थिक सहायता प्रदान करणार आहे. सरकारने ही योजना जाहीर केल्यानंतर महिला ऑफलाईन किंवा नारी शक्तीदूत ॲपवरुन अर्ज करत होत्या. पण, तांत्रिक समस्या लक्षात घेता सरकारने अर्ज करण्यासाठी नवीन वेबसाइट सुरू केली आहे.
नवीन वेबसाईट लिंक – www.ladkibahin.maharashtra.gov.in
अधिक वाचा –
– लोणावळेकरांनो काळजी घ्या, पावसाचा जोर वाढलाय, यंदाच्या मोसमात 4000 मिलिमीटर पाऊस पूर्ण, वाचा अधिक । Lonavala Rain Updates
– मावळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जोरदार इन्कमिंग, ग्रामीण भागातील अनेकांचा पक्षप्रवेश, शरद पवारांची घेतली भेट
– मोठी बातमी ! पावसाचा जोर प्रचंड वाढला, पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला, पवना नदीपात्रात 7070 क्युसेक विसर्ग सुरू । Pavana Dam News