Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील श्री विठ्ठल मंदिरात संत नामदेव महाराज यांचा 674 वा संजीवन समाधी सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न झाला. पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा, अभिषेक करण्यात आला. काकड आरती, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तसेच यावेळी हभप मुरलीधर महाराज ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली बारा दिवस आयोजित करण्यात आलेल्या, संत नामदेव महाराज गाथा पारायण सोहळा याचीही समाप्ती करण्यात आली. त्यानंतर ग्राम प्रदक्षिणा पालखी सोहळा, नामदेव पायरीला पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी आरती आणि महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते. ( Sant Namdev Maharaj Samadhi Ceremony at Vitthal Temple in Talegaon Dabhade )
शिंपी समाजाचे दिलीप हेंद्रे, नारायण हेंद्रे, हरिदास वनारसे,अरुण हेंद्रे, अमोल सलागरे, मोहन डंबे, मीना डंबे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी ह भ प उद्धव महाराज कोळपकर यांच्या कीर्तनाने कार्यक्रम संपन्न झाला. श्री विठ्ठल मंदिराचे विश्वस्त बाळकृष्ण आरडे, यतीन शहा, प्रशांत दाभाडे, श्याम भेगडे, मृदुंगमणी खराडे महाराज, दिनेश दरेकर यांचे यात विशेष सहकार्य केले.
अधिक वाचा –
– जांबवली येथील श्री कोंडेश्वर महादेवाच्या शिवलिंगावर मुंबईतील शिवभक्ताकडून चांदीचा पत्रा अर्पण । Maval News
– मावळ तालुक्यातील ‘या’ दोन शाळांचा ‘लोकमान्य टिळक आदर्श शाळा’ पुरस्कार देऊन गौरव । Maval News
– अखेर 22 वर्षांच्या लढ्याला यश ! शेलारवाडी आणि तळेगाव येथील डीआरडीओ संपादित जमिनींना वाढीव मोबदला देण्याचे निर्देश