Dainik Maval News : महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाच्या माध्यमातून वडगाव नगरपंचायत अग्निशमन दलाला फायर बुलेट उपलब्ध झाली आहे. यामुळे आता वडगाव शहर आणि परिसरातील अरुंद, तसेच गल्लीबोळ असणाऱ्या ठिकाणी जर काही आगीची दुर्घटना घडली, तरीही तिथे मदत पोहोचवणे शक्य होणार आहे. अरुंद रस्त्यांवर या फायर बुलेटमुळे जलद गतीने पोहचून आगीवर नियंत्रण आणण्यात मोठी मदत होईल, अशी माहिती वडगाव नगरपंचायतचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
काय आहे खासियत ?
अग्निशमन दलाचे अत्याधुनिकीकरण करणे, त्यामध्ये जलदता आणणे, कमी खर्चामध्ये, कमी मनुष्यबळामध्ये घटनास्थळापर्यत तात्काळ पोहोचविण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे हा उदेश समोर ठेवून या फायर बुलेटची रचना करण्यात आली आहे. रॉयल एनफिल्ड 350 सीसीची बुलेट मॉडीफाईड करण्यात आली असून, यामध्य दोन फोम सिलिंडर ज्याची क्षमता नऊ लिटरची आहे ते बसविण्यात आले आहेत. फायर बुलेटचे प्रेशर 312 हॉर्स पॉवर इतके असून, या गाडीबरोबर प्रथमोपचारासाठी आवश्यक असणारे किट देखील देण्यात आले आहे.
वडगाव शहर व परिसरातील ज्वलनशील प्रसंग टाळण्यासाठी गेल्या वर्षी अग्निशमन ची गाडी घेण्यात आली. आगीच्या घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सतत मोठी कामगिरी करणारे वडगाव नगरपंचायत अग्निशमन दल या फायर बुलेटच्या उपलब्धतेने आणखीन सक्षम झाले आहे असा विश्वास माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी व्यक्त केला. ( Inclusion of Fire Bullet in Fire Department of Vadgaon Nagar Panchayat Maval News )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील दोन बाल गायिकांची टीव्हीवरील रियालिटी शोमध्ये निवड । Maval News
– आंबी – निगडे रस्त्यावर स्थानिक ग्रामस्थांचा रास्ता रोको, अवजड वाहतूकीवर बंदी घालण्याची मागणी । Maval News
– महत्वाची बातमी ! मावळ तालुक्यातील ‘त्या’ तिहेरी हत्याकांड प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना । Crime News