Dainik Maval News : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मावळ तालुक्यातील विकासकामांची आढावा बैठक आज (दि. 8) मंत्रालयात संपन्न झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
उपमुख्यमंत्री दालनात संपन्न झालेल्या बैठकीला क्रीडा मंत्री संजय बनसोडे, तसेच जलसंपदा, नियोजन, वित्त, क्रीडा, सा.बां.विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पर्यटन विभाग या विभागांचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव यांसह प्रमुख अधिकारी आणि व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी पुणे, आयुक्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे उपस्थित होते. ( DCM Ajit Pawar Reviewed Development Works In Maval Taluka In Presence MLA Sunil Shelke Minister Sanjay Bansode )
बैठकीत घेण्यात आलेले निर्णय पुढीलप्रमाणे –
1. कार्ला येथील आई एकविरा देवी तीर्थक्षेत्र विकास आराखडा, संत जगनाडे महाराज तीर्थक्षेत्र विकास आराखडा यांसह कार्ला येथील चाणक्य सेंटर फॉर एक्सलेन्स, लायन्स व टायगर पॉईंट येथील ग्लास स्कायवॉक या कामाची निविदा प्रक्रिया 30 ऑगस्ट 2024 पर्यंत पूर्ण करून कार्यारंभ आदेश देण्याबाबतच्या सूचना अजितदादांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
2. लोणावळा व कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालय नुतन इमारतीमधील उर्वरित कामे, शस्त्रक्रिया गृह मोड्युलर करणे, फर्निचर व इतर कामांची निविदा प्रक्रिया तात्काळ राबवून दोन्ही रुग्णालये लवकरात लवकर सर्वसामान्यांसाठी खुली करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
3. जांभूळ येथील क्रीडा संकुलाचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी प्रतिक्षेत आहे. यासाठी राज्य क्रीडा विकास समितीची तात्काळ बैठक आयोजित करुन त्यात मंजुरी मिळणेसाठी उपमुख्यमंत्र्यांसह क्रीडामंत्री यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
4. इंद्रायणी नदीवरील टाकवे व कार्ला–मळवली रस्त्यावरील पुलांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करुन सदर कामे तात्काळ पूर्ण करण्याबाबतच्या सूचना उपमुख्यमंत्री महोदयांनी दिल्या आहेत.
5. बैठकीमध्ये कान्हे रेल्वे उड्डाणपूल, ADB अंतर्गत कान्हे ते सावळा रस्ता यांसह इतर छोट्या – मोठ्या विकासकामांबाबत सखोल आढावा घेत सर्व विकासकामे अतिशय गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होणेबाबतच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
अधिक वाचा –
– सांस्कृतिक कार्य विभागाकडून यंदाही सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त स्पर्धेची घोषणा, 31 ऑगस्टपूर्वी करा अर्ज, वाचा अधिक
– बाळा भेगडे यांची तळेगाव पोलिसांत तक्रार, मराठा मोर्चाचे विनोद पोखरकर यांच्यावर गुन्हा दाखल । Bala Bhegade News
– वडगाव शहरातील अग्निशमन विभाग बनला अधिक सक्षम, ताफ्यात नव्या ‘फायर बुलेट’चा समावेश, वाचा खासियत । Vadgaon Maval