Dainik Maval News : मावळ तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थस्थळ, पर्यटनस्थळ असलेल्या कार्ला येथील एकविरा देवी मंदिर परिसराचा विकास करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आमदार सुनिल शेळके यांच्या सततच्या पाठपुराव्यातून आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या विशेष सहयोगातून एकविरा देवी मंदिर परिसराचा नियोजित विकास होणार आहे. यापार्श्वभूमीवर मंदिर परिसरात करायवयाच्या विविध विकासकामांचा शासकीय यंत्रणांनी नुकताच आढावा घेतला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान एकवीरा देवी मंदिर परिसरातील विकास कामांचा श्री एकवीरा देवस्थान ट्रस्ट चे पदाधिकारी यांसोबत शासनच्या विविध अधिकारी वर्गाने नुकताच पाहणी दौरा केली. यात गडावर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या, रोप वे या कामांची स्थळ पाहणी करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी गड परिसरात करावयाची विकास कामे, पायऱ्या आणि रोप वे ची जागा अधिकारी वर्गांना दाखवत कामांची माहिती दिली. ( Ekvira Devi temple area on Karla Fort will be developed Government agencies reviewed works )
यावेळी वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक मयूर बोटे, एमएसआरडीसी विभागीय अभियंता सूर्वणा पाडवी, श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, वन परिक्षेत्र अधिकारी सुशिल मंतावर, वन परिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर, एमएसआरडीसी कनिष्ठ अभियंता विक्रमसिंह ठाकूर, वाल्मिकी सर्वेयर संजय भुजबळ,नंदकुमार पदमुले उपस्थित होते.
अधिक वाचा –
– पीएम-किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 1 हजार 698 कोटी 70 लाख रुपये जमा
– मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय, लाखो नागरिकांना होणार लाभ
– नगराध्यक्षांचा कालावधी आता अडीच ऐवजी पाच वर्षे ; राज्य सरकारचे अनेक मोठे निर्णय, वाचा सविस्तर