Dainik Maval News : पवन मावळ विभागातील वाघेश्वर या गावचे सुपूत्र आणि लोणावळा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा गटनेते देवीदास कडू यांना काव्यमित्र संस्था पुणे यांच्या वतीने राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. देविदास कडू यांनी लोणावळा शहर परिसरात अनेक वर्षे केलेली विकास कामे आणि सामाजोपयोगी प्रकल्प यासंदर्भात हा पुरस्कार त्यांना स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू पंडित विद्यासागर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी विस्तार अधिकारी पंचायत, समाज कल्याण अध्यक्ष वसंत वाघमारे, प्राचार्य बालाजी जाधव, वनिता पंडित, काव्यमित्रचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सगर, कवी राजेंद्र बसरीकट्टी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना पंडित विद्यासागर यांनी पुरस्कार्थींनी समाजमने साधण्याचे काम करावे, असे आवाहन केले. आज देशापुढे अनेक आव्हाने आहेत, त्यांना सामोरे जाण्याकरिता कटीबद्ध राहावे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन उफाडे यांनी केले. सूत्रसंचालन साक्षी सगर यांनी केले. हा पुरस्कार आपण तमाम लोणावळेकरांच्या चरणी अर्पण करीत आहोत, असे देविदास कडू यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितले. तर पुरस्कार मिळाल्याबद्दल देविदास कडू यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अधिक वाचा –
– इंदोरी गावातील रिंगरोड बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा, बाळा भेगडे यांच्या प्रयत्नांना यश । Maval News
– आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते ‘पशुधन पुरस्कार 2024’ चे वितरण । Kamshet News
– जगभर दहशत निर्माण करणारा ‘मंकीपॉक्स’ आजार नक्की काय आहे? आजाराची लक्षणे कोणती, काळजी काय घ्यावी? जाणून घ्या