Dainik Maval News : पोलीस दलात चांगली कामगिरी बजावलेल्या वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील 6 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. यासंबंधीचे आदेश पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी काढले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पदोन्नती देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस नाईक असलेल्या कर्मचाऱ्यांना हवालदारपदी आणि हवालदार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.
यामध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून सुनील जावळे यांना पदोन्नतीचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रमाणेच पोलीस नाईक म्हणून काम करणाऱ्या उमाची मुंडे, शशिकांत खोपडे, संदिप चौधरी, संदिप वंडाळे यांना पोलीस हवालदारपदी बढती देण्यात आली आहे.
वडगाव मावळ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या हस्ते पदोन्नती झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक पोठिस उपनिरीक्षक डोईजड पोठिस उपनिरीक्षक सुनिल सांळुखे उपस्थित होते.
अधिक वाचा –
– गृह विभागाकडून महिलांच्या सुरक्षेकरिता विविध उपाययोजनांची अंमलबजावणी ; वाचा सविस्तर
– इंदोरी गावातील रिंगरोड बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा, बाळा भेगडे यांच्या प्रयत्नांना यश । Maval News
– आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते ‘पशुधन पुरस्कार 2024’ चे वितरण । Kamshet News