Dainik Maval News : ‘मरावे परी कीर्ती रूपे उरावे’ ही उक्ती प्रत्येकाच्याच आयुष्याबाबत समर्पक ठरते असे नाही. परंतु काही व्यक्तींच्या जाण्यानंतरही त्यांच्या व्यक्तिमत्वाची चर्चा होत राहते, तेव्हा मात्र या उक्तीची आठवण प्रकर्षाने होते. मावळ तालुक्यातील माऊ या गावातील कै. सतिश विठोबा जगताप यांच्या निधनाला आज चार वर्षे उलटून गेली आहेत, मात्र त्यांच्या आठवणीत आजही अनेकांचे डोळे पाणवतात. त्यांचा मंगळवारी (दि. 20 ऑगस्ट) चतुर्थ पुण्यस्मरण दिन होता. त्यानिमित्त जगताप कुटुंबिय आणि मित्रपरिवाराने अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मंगळवारी (दि. 20 ऑगस्ट) रोजी कै. सतिश विठोबा जगताप यांचे चतुर्थ पुण्यस्मरण होते. त्यानिमित्त जगताप कुटुंबीयांनी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. यात विशेष म्हणजे पंचक्रोशीतील महिला भगिनींना साडी वाटप करण्यात आले. सायंकाळी 6 ते 7 दरम्यान कांब्रे येथील प्रख्यात प्रवचनकार हभप पांडुरंग महाराज शास्त्री यांचे सुश्राव्य प्रवचन झाले. प्रवचन सेवेनंतर भाजपा युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष किरण जगताप यांच्यामार्फत साडी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरातील बहुतांश नागरिक उपस्थित होते. महिलांना साडी वाटप केल्यानंतर अन्नदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
चार वर्षांपूर्वी माऊ गावचे सुपूत्र सतिश जगताप यांचे बोरिवली येथील समुद्रात झालेल्या बोट दुर्घटनेत दुःखद निधन झाले होते. गावातील एक हसतमुख आणि आदर्श व्यक्तिमत्व या अपघातात हरपले होते. तर जगताप कुटुंबातील आनंदाचा ठेवा हरपला होता. त्यांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी दरवर्षी पुण्यस्मरणादिनाला जगताप कुटुंब आणि मित्रपरिवार विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करतात.
अधिक वाचा –
– तळेगाव नगरपरिषदेचे अधिकारी – कर्मचारी जाणार संपावर, जाणून घ्या कारण… । Talegaon Dabhade
– गृह विभागाकडून महिलांच्या सुरक्षेकरिता विविध उपाययोजनांची अंमलबजावणी ; वाचा सविस्तर
– इंदोरी गावातील रिंगरोड बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा, बाळा भेगडे यांच्या प्रयत्नांना यश । Maval News