व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 18, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर ; दिनांक १९ ते २८ सप्टेंबर हा आठवडा ठरणार पर्व आरोग्य क्रांतीचे

आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर ; दिनांक १९ ते २८ सप्टेंबर हा आठवडा ठरणार पर्व आरोग्य क्रांतीचे

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 15, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
mla-sunil-shelke

File Image - mla sunil shelke


Dainik Maval News : मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे हे सातवे वर्ष असून १९ ते २८ सप्टेंबर कालावधीत सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कान्हे उपजिल्हा रुग्णालय येथे शिबिर होणार आहे. तसेच मावळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत या आरोग्य शिबिराचा लाभ मिळावा यासाठी विविध स्तरावर जनजागृती करण्यात येणार आहे.

माय माऊली ज्येष्ठ नागरिक संघ मावळ, श्री विठ्ठल परिवार मावळ, कुलस्वामिनी महिला मंच मावळ या संस्था संयोजन करणार आहेत.

शिबिरात एमआरआय तपासणी, सीटी स्कॅन तपासणी, सोनोग्राफी, एक्स-रे, रक्त तपासणी, चष्मे, औषधे, श्रवण यंत्र या सुविधांबरोबरच मोफत रुग्णवाहिका सेवा देखील देण्यात येणार आहे.

तब्बल 25 प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया व उपचार – शिबिराच्या अंतर्गत हृदयाच्या शस्त्रक्रिया, अन्ननलिका शस्त्रक्रिया. मोतीबिंदू, हाडांचे फ्रॅक्चर, कान – नाक –घसा शस्त्रक्रिया, श्वसनालिकेच्या शस्त्रक्रिया, अंगावरील मोठ्या चरबीच्या गाठीची शस्त्रक्रिया, मणक्याच्या, किडनीच्या, गर्भपिशवीच्या, मुतखड्याच्या, सांध्याच्या, अपेंडिक्सच्या, मूळव्याधीच्या शस्त्रक्रिया, मॅमोग्राफी, हर्निया, पित्ताशय किंवा पित्ताशयातील खड्यांची शस्त्रक्रिया, कॅन्सर संदर्भात शस्त्रक्रिया, गर्भाशयातील गाठींची शस्त्रक्रिया, डोळ्यांचा तिरळेपणा व अन्य समस्यांबद्दल शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारावरील उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. तसेच श्रवणयंत्र, चष्मे, रक्त तपासणी आणि नेत्र तपासणी देखील मोफत करण्यात येणार आहे. यासाठी रुग्णांनी आधार कार्ड, रेशनिंग कार्ड आणि जुन्या आजाराचे मेडिकल रिपोर्ट सोबत घेऊन यायचे आहे.

निरोगी मावळचा संकल्प करणारे हे महाआरोग्य शिबिर गुरुवार दिनांक १९ ते २८ सप्टेंबर या काळात उपजिल्हा रुग्णालय कान्हे येथे आयोजित केले आहे.एकाच दिवशी गर्दी होऊ नये यासाठी प्रत्येक गावनिहाय दिवस ठरविण्यात आला आहे.

देहूगाव, इंदोरी, आंबी परिसर – गुरुवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी देहू शहर सुदुंबरे, सुदवडी, जांभवडे, इंदोरी, माळवाडी, वराळे, नाणोली तर्फे चाकण, आंबी, वारंगवाडी, नवलाख उंबरे, बधलवाडी, जाधववाडी, परीटेवाडी, मिंडेवाडी, गोळेवाडी, मंगरूळ, शेटेवाडी, कदमवाडी आणि आंबळे या गावांतील नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे.

shivraj mobile kamshet

सोमाटणे, बेबेड ओहोळ, चांदखेड परिसर – शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर रोजी सोमाटणे, शिरगाव, गहुंजे, साळुंब्रे, गोडुंब्रे, सांगवडे, दारूंब्रे, कुसगाव, पाचाणे, पुसाणे, दिवड, ओवळे, डोणे, आढले बु., आढले खु., चांदखेड, देवगड, बेबडओहोळ, परंदवडी, धामणे, पिंपळखुटे, शिवणे, मळवंडी ढोरे, थुगाव, आर्डव या गावांतील नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे.

वडगाव-कामशेत परिसर – शनिवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी वडगाव मावळ, कामशेत, कातवी, जांभूळ, सांगवी, ब्राह्मणवाडी, मोहितेवाडी, साते, कान्हे, अहिरवडे, नायगाव, चिखलसे, कुसगाव खु., खामशेत, टाकवे बु., फळणे, बेलज, राजपुरी या गावांतील नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे.

पवन मावळ परिसर – सोमवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी उर्से, आढे, ओझर्डे, सडवली, बऊर, येलघोल, धनगव्हाण, शिवली, भडवली, कोथुर्णे, मळवंडी ठुले, वारू, ब्राह्मणोली, गेव्हंडे खडक, ठाकूरसाई, तिकोना, गेव्हंडे वसाहत, जवण १,२,३, अजिवली, शिळींब, वाघेश्वर, कादव, चावसर, मोरवे, तुंग, कोळे, चाफेसर, पानसोली या गावांतील नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे.

मंगळवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी गोवित्री, वडवली, वळवंती, कोळवाडी, भाजेगाव, सोमवडी, शिरदे, आपटी, थोरण, जांभवली, उकसान, पाले ना.मा., करुंज, बेडसे, कडधे, गेव्हंडे, येळसे, शेवती वसाहत, सावंतवाडी, निकमवाडी, प्रभाचीवाडी, धालेवाडी. धामणदरा, मालेवाडी, पवनानगर, काले, आंबेगाव, शिंदगाव, दुधिवरे, लोहगड या गावांतील नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे.

आंदर मावळ परिसर – बुधवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी नागाथली, वहानगाव, कुसवली, बोरवली, काम्ब्रे आ.मा., डाहुली, बेंदेवाडी, कुसूर, खांडी, सावळा, पाथरगाव, ताजे, पिंपळोली, बोरज, मळवली, पाटण, भाजे, देवले, सदापूर, कार्ला, वेहेरगाव, दहिवली, शिलाटणे, टाकवे खु., फांगणे, मुंढावरे, वाडीवळे, वळक, बुधवडी, संगिसे, वेल्हवडी, नेसावे, खांडशी, उंबरवाडी या गावांतील नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे.

नाणे मावळ परिसर – गुरुवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी करंजगाव, साबळेवाडी, ब्राह्मणवाडी, कांब्रे ना.मा., कोंडीवडे ना.मा., नाणे, नवीन उकसान, नाणोली, साई, पारवाडी, वाउंड, कचरेवाडी, घोणशेत, माऊ, वडेश्वर, शिंदे/घाटेवाडी, मोरमारवाडी, गभालेवाडी, डोंगर/सटवाईवाडी, कोंडीवडे ना.मा., भोयरे, कल्हाट, पवळेवाडी, निगडे, शिरे, कशाळ, किवळे, इंगळून, पारीठेवाडी, अनसुटे, कुणे, कुणेवाडी, माळेगाव खु., पिंपरी, तळपेवाडी, माळेगाव बु. या गावांतील नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे.

लोणावळा परिसर – शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी लोणावळा, ओळकाईवाडी, गुरववस्ती, कुसगाव बु., भैरवनाथनगर, प्रेमनगर, औंढे, कुसगाववाडी, केवरे वसाहत, डोंगरगाव, डोंगरगाववाडी, औंढोली, कुरवंडे, कुणे ना.मा., राजमाची, उंडेवाडी, पांगळोली, वरसोली, वाकसई, देवघर, करंडोली, जेवरेवाडी या गावांतील नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे.

तळेगाव व देहूरोड – शनिवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी तळेगाव दाभाडे आणि देहूरोड छावणी परिषद येथील नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे.

25 रुग्णालयांचे सहकार्य – शिबिरामध्ये मायमर हॉस्पिटल – तळेगाव दाभाडे, वाय सी एम हॉस्पिटल – पिंपरी, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल – पिंपरी, पायोनिअर हॉस्पिटल – सोमाटणे, नित्यसेवा हॉस्पिटल – कार्ला, डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल – पिंपरी, न्यू इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटल – आळंदी, स्टर्लिंग आयुर्वेदिक हॉस्पिटल, पवना हॉस्पिटल – सोमाटणे, सेवाधाम हॉस्पिटल – तळेगाव दाभाडे, एनआयओ हॉस्पिटल – पुणे, लाईफ पॉइंट हॉस्पिटल – वाकड, ॲकॉर्ड हॉस्पिटल – मोशी, लोकमान्य हॉस्पिटल – चिंचवड, आदित्य बिर्ला हॉस्पिटल – चिंचवड, आँको लाईफ हॉस्पिटल – तळेगाव दाभाडे, रुबी अल्केअर – पिंपरी, एम्स हॉस्पिटल – औंध, संजीवनी हॉस्पिटल – लोणावळा, एच.व्ही. देसाई हॉस्पिटल – पुणे, ढाकणे हॉस्पिटल – तळेगाव दाभाडे, ईशा आय केअर – चिंचवड, गुंजकर हॉस्पिटल – चिंचवड, बडे हॉस्पिटल – सोमाटणे यांच्याकडून वैद्यकीय सेवा पुरवली जाणार आहे.

सहा डायग्नोस्टिक सेंटरचा सहभाग – शिबिरात साक्षी डायग्नोस्टिक सेंटर – सोमाटणे, साक्षी डायग्नोस्टिक – लोणावळा, कृष्णा डायग्नोस्टिक – चिंचवड, मावळ इमॅजिन – तळेगाव दाभाडे, एनसीएस पॅथालॉजी लॅब – कार्ला, साक्षी डायग्नोस्टिक – तळेगाव दाभाडे या केंद्रांच्या वतीने रुग्ण तपासणी करण्यात येणार आहे.

मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशन, माय माऊली ज्येष्ठ नागरिक संघ मावळ, श्री विठ्ठल परिवार मावळ आणि कुलस्वामिनी महिला मंच मावळ यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन केले आहे.जास्तीत जास्त नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


dainik maval jahirat

Previous Post

बऊर येथे आढळला 11 फुटी महाकाय अजगर; वन्यजीव रक्षक मावळच्या सर्पमित्रांनी सोडले नैसर्गिक अधिवासात । Maval News

Next Post

गौरी गणपती विसर्जनानंतर मावळात ‘लेकी मागण्याची’ परंपरा ; गावोगावी रंगला लेकी मागण्याचा खेळ । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Tradition of Leki Magne

गौरी गणपती विसर्जनानंतर मावळात 'लेकी मागण्याची' परंपरा ; गावोगावी रंगला लेकी मागण्याचा खेळ । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन इमारतीसह 77.54 कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण आणि 683.63 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

October 18, 2025
Ajit Pawar will inaugurate head office of Shri Dolasnath Cooperative Society Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन । Talegaon Dabhade

October 18, 2025
Adulterated stock worth Rs 2 crore seized during festive season major action by Food and Drug Administration

सणासुदीच्या काळात दोन कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त, अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई । Pune News

October 18, 2025
Bogus voters in voter list Shiv Sena UBT Party statement to Tehsildar Vadgaon Maval

मतदार यादीत बोगस मतदार… शिवसेना उबाठा पक्षाचे तहसीलदार यांना निवेदन । Vadgaon Maval

October 18, 2025
Talegaon Dabhade Municipal Council Election NCP Party invites applications from interested candidates

तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागविले इच्छुक उमेदवारांचे अर्ज । Talegaon Dabhade

October 18, 2025
Womens honor ceremony in Induri Attractive Paithani gift from Vighnahar Patsanstha

इंदुरीत महिलांचा सन्मान सोहळा – विघ्नहर पतसंस्थेकडून आकर्षक पैठणी भेट

October 17, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.