Dainik Maval News : मावळ तालुक्यातील 5 शिक्षकांसह एकूण 63 शिक्षकांना जिल्हा गुणवंत शिक्षक आणि जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. रविवारी (दि. 15) हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी व माध्यमिक शिक्षिका संघ यांच्या वतीने दरवर्षी प्रत्येक तालुक्यातील विशेष शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सम्मानित केले जाते. यावर्षीचा गुणवंत शिक्षक पुरस्कार व जीवन गौरव पुरस्कार सोहळा सासवड येथे संपन्न झाला.
मावळ तालुक्यातील मुख्याध्यापक रमेश फरताडे (आमदार प्रकाश देवळे विद्यालय, शिरगाव), मनोजकुमार क्षीरसागर (ज्ञानेश्वर विद्यानिकेतन, जवण), संतोष भोसले (पद्मावती विद्यालय, उर्से), बळीराम भंडारे (वारू कोथुर्णे विद्यालय, वारू), अनुसया दातीर (संत ज्ञानेश्वर विद्यालय, दिवड-राजेवाडी) यांसह पुणे जिल्ह्यातील एकूण ६३ शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
अधिक वाचा –
– वडगाव मावळ येथील प्रसिद्ध व्याख्याते विवेक गुरव यांना राज्यस्तरीय संवादरत्न पुरस्कार । Vadgaon Maval
– आवाहन ! अवजड वाहन चालकांनी मुंबई – पुणे महामार्गावरुन प्रवास टाळावा, वाचा काय आहे सुचना
– गौरी गणपती विसर्जनानंतर मावळात ‘लेकी मागण्याची’ परंपरा ; गावोगावी रंगला लेकी मागण्याचा खेळ । Maval News