Dainik Maval News : मतदाराने ज्या उमेदवाराला मतदान केले, त्यालाच ते मिळाले की नाही याची माहिती मिळणे हा मतदाराचा हक्क आहे. ही माहिती व्हीव्हीपॅट मशीनद्वारे कशी समजून घ्यावी, याबाबत जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून गावोगावी मोबाइल व्हॅन फिरविण्यात येत आहे. मावळ तालुक्यात कार्ला येथे तालुका प्रशासनाच्या मदतीने नागरीकांमध्ये व्हीव्हीपॅट बाबत जनजागृती करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी आशा धायगुडे, सरपंच दीपाली हुलावळे, तलाठी दीपक धनवडे, अर्जुन चव्हाण ,सुप्रिया कावरे, शुभम मावकर यांनी व्हीव्हीपॅट मशिनची सविस्तर महिती नागरिकांना दिली. मतदाराला आपण कोणाला मतदान केले, तसेच ज्या उमेदवाराला मतदान केले ते चिन्ह आणि चिठ्ठी व्हीव्हीपॅट मशीनमध्ये दिसते. निवडणूक आयोगाच्या या प्रात्याक्षिक मोहिमेमुळे मतदार राजा आनंदी होत आहे, असे कार्ला मंडल अधिकारी आशा धायगुडे यांनी सांगितले.
इव्हीएम मशीनद्वारे निवडणूका घेत असताना, त्याबद्दलच्या सर्व शंका दूर करण्याचे प्रयत्न निवडणूक आयोगाने सुरू केले आहेत. यामुळे मतमोजणीवर घेतले जाणारे आक्षेप कमी होणार आहेत. व्हीव्हीपॅट मशीन ही पारदर्शक प्रणाली असून, यातून मतदाराने निवडणूकीत कुणाला मतदान केले हे समजणार आहे. तसेच मतमोजणीवर वाद निर्माण झाल्यास निवडणूक आयोगाला व्हीव्हीपॅट पावत्यांच्या मदतीने निकाल निश्चित करणे शक्य होणार आहे.
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायतीचा ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम, अधिकारी – कर्मचारी यांच्याकडून वृक्षलागवड । Vadgaon Maval
– तळेगाव नगरपरिषदेच्या शहर पथविक्रेता समितीच्या सदस्य पदाची निवडणूक बिनविरोध । Talegaon Dabhade
– लोणावळ्यातील सतरा वर्षीय बेपत्ता मुलाचा मृतदेह टाटा धरणात आढळला । Lonavala News