Dainik Maval News : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी आणि गोल्डन रनिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच संतोष परदेशी यांच्या सहकार्याने तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला शोभेची फुलझाडे भेट देण्यात आली. शुक्रवारी, दि. 27 सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडला. रोटरी सिटीच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्राला नेहमीत भरीव मदत नेहमी केली जाते. त्याअंतर्गत नवीन इमारतीच्या सुशोभीकरणासाठी ही झाडे भेट देण्यात आल्याचे क्लबचे अध्यक्ष किरण ओसवाल यांनी सांगितले.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने डॉ. चौधरी यांनी कृतज्ञता व्यक्त करून सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. पोळ, सहप्रांतपाल दीपक फल्ले, विशाल खळदे, ऋषिकेश कुलकर्णी, सुरेश दाभाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमोद दाभाडे, प्रदीप मुंगसे, बसप्पा भंडारी, रामनाथ कलावडे, दशरथ ढमढेरे, हर्षल डंबे, महेश भेगडे, योगेश रहाळकर, अविनाश कुरणे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप ताये, प्रास्ताविक प्रदीप टेकवडे यांनी केले. आभार प्रदर्शन रो भगवान शिंदे यांनी केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कान्हे येथील महाआरोग्य शिबिराचा शनिवारी शेवटचा दिवस, आतापर्यंत 40 हजाराहून अधिक मावळवासियांनी घेतला लाभ
– पावसाने मोडला रेकॉर्ड : लोणावळ्यात यंदा 5822 मिमी पाऊस, गेल्या 24 तासात तब्बल 155 मीमी पाऊस । Lonavala Rain
– मावळ विधानसभेत एक लाखाहून अधिक ‘लाडक्या बहिणी’, आमदार सुनिल शेळकेंकडून योजनेचा आढावा । Mazi Ladki Bahin Yojana