Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी मावळ तालुक्यातील आदर्श केंद्र शाळा असलेल्या कान्हे शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेच्या वतीने सीईओ संतोष पाटील यांचे ढोल-ताशा आणि लेझीमच्या गजरात उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी मावळ मुळशीचे प्रांतअधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार रणजित देशमुख, माजी गट विकास अधिकारी सुधीर भागवत, नवनियुक्त गट विकास अधिकारी के के प्रधान, गटशिक्षण अधिकारी सुदाम वाळुंज, शिक्षण विस्तार अधिकारी शोभा वहिले, केंद्रप्रमुख तथा विस्तार अधिकारी निर्मला काळे, सरपंच विजयराव सातकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समीर सातकर, आरती भाळवणे, स्वप्नाली आरोटे आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शाळेची गुणवत्ता, नाविन्यपूर्ण उपक्रम, सीएसआर फंड व गावच्या माध्यमातून झालेली कामे याचा आढावा घेतला व विशेष कौतूक केले. यापुढेही शाळेकडून गुणात्मक दर्जाचा आलेख वाढता राहिलेला दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी कान्हे शाळेचे आकर्षण असलेल्या ‘फ्यूचरिस्टीक क्लासरुम’ला भेट देत प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापनाचा अनुभव घेतला. शिक्षिका अक्षता अंब्रुळे, संगिता मधे, काजल रणदिवे यांनी क्लासरूमची माहिती दिली.
यावेळी नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय गड किल्ले स्पर्धेत कान्हे शाळेने साकारलेल्या ‘शिवनेरी’ गडाची मान्यवरांनी पाहणी केली. कान्हे शाळेच्या या कलाकृतीसाठी तालुक्यात द्वितीय क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे. यावेळी शाळेतील गुणवंत विद्यार्थी, गायक प्रतीक लहासे याने शिवरायांचा पोवाडा गाऊन सीईओ पाटील यांसह सर्व पाहुण्यांना मंत्रमुग्ध केले. पाटील यांनीही प्रतीकला बक्षीस देऊन त्याचे कौतूक केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची कुसगाव बुद्रुक येथे कारवाई ! अंमली पदार्थांसह 3 लाख 27 हजारांचा मुद्देमाल जप्त
– सरसेनापती श्रीमंत खंडेराव दाभाडे यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन । Talegaon Dabhade
– महागाव सोसायटीच्या अध्यक्षपदी चंद्रभागा तिकोणे बिनविरोध । Pavana Nagar