Dainik Maval News : राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील एकविरादेवी च्या नवरात्रोत्सवाला घटस्थापनेने सुरूवात होणार आहे. नवरात्रोत्सव काळात राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक कार्ला, वेहेरगाव येथे येत असतात. त्या अनुषंगाने मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उत्सवाचे नियोजन सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर लोणावळा पोलिसांनी स्थानिक रिक्षा चालकांसोबत विशेष बैठक पार पडली. लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ, सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रंशात तावरे यांनी वेहरगाव, दहिवली, कार्ला, मळवली येथील रिक्षाचालकांची बैठक घेतली. यावेळी नवरात्रोत्सव काळात रिक्षाचालकांनी प्रशासनाच्या नियमांचे पावन करावे, आरटीओच्या सुचना पाळाव्यात असे सांगण्यात आले.
वेहरगाव पायथा मंदिर, कार्ला फाटा याठिकाणी पार पडलेल्या या बैठकीला आरटीवो अधिकारी, पोलिस पाटील संजय जाधव, अनिल पडवळ, शहाजान इनामदार, नितिन कदम, सतीश कुदळे, विजय मुंडे यांंच्यासह सर्व रिक्षाचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन, ‘इथे’ करा अर्ज । Pune News
– मावळच्या लोकप्रतिनिधीचा केंद्रात सन्मान ! खासदार बारणे यांची केंद्रीय ऊर्जा विभागाच्या स्थायी समिती अध्यक्षपदी निवड । MP Shrirang Barne
– पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची कान्हे शाळेला सदिच्छा भेट । Maval News