Dainik Maval News : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि इतर सहयोगी संस्थांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचा शनिवारी (दि.30) समारोप झाला. तब्बल नऊ दिवस चाललेल्या या महाआरोग्य शिबिरात जवळपास 50 हजारहून अधिक मावळवासियांनी विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहभाग महाआरोग्य शिबिराला यशस्वी बनवणारा मुख्य घटक ठरला. भविष्यात देखील असेच लोकाभिमुख उपक्रम राबवून सर्वांची सेवा करत राहु, असे आयोजकांनी सांगितले.
सदर शिबिरात एमआरआय तपासणी, सिटीस्कॅन तपासणी, सोनोग्राफी, एक्स-रे, रक्त तपासणी, मोफत चष्मे, औषधे, श्रवण यंत्र या सुविधांबरोबरच मोफत रुग्णवाहिका पुरविण्यात आली होती. शिबिराअंतर्गत हृदयाच्या शस्त्रक्रिया, अन्ननलिका शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, हाडांचे फ्रॅक्चर, कान -नाक–घसा शस्त्रक्रिया, श्वसनालिकेच्या शस्त्रक्रिया, अंगावरील मोठ्या चरबीच्या गाठीची शस्त्रक्रिया, मणक्याच्या, किडनीच्या, गर्भपिशवीच्या, मुतखड्याच्या, सांध्याच्या, अपेंडिक्सच्या, मूळव्याधीच्या शस्त्रक्रिया, मॅमोग्राफी, हर्निया, पित्ताशय किंवा पित्ताशयातील खड्यांची शस्त्रक्रिया, कॅन्सर संदर्भात शस्त्रक्रिया, गर्भाशयातील गाठींची शस्त्रक्रिया, डोळ्यांचा तिरळेपणा व अन्य समस्यांबद्दल शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारावरील उपचार व उपचार या सगळ्या शस्त्रक्रिया मोफत आणि सवलतीच्या दरात करण्यात आल्या.
“मागील नऊ दिवसांपासून सुरु असलेल्या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचे समाधान मिळाले. नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या समजून घेऊन त्यांना आवश्यक तपासण्या, योग्य उपचार व वैद्यकीय साहित्य देण्याची संधी मिळाली, ही आमच्यासाठी खूपच जबाबदारीची गोष्ट आहे आणि ही आरोग्यसेवेची जबाबदारी निभावण्यासाठी आम्ही नेहमीच पुढे राहू.” – आमदार सुनिल शेळके
मावळ तालुक्याचा बहुतांश भाग डोंगरी आहे. तसेच अनेग गावे ही दुर्गम भागात असल्याने तालुक्याच्या कानाकोपऱ्यात आजही आवश्यक त्या आरोग्य सुविधा मिळताना दिसत नाही. अनेकदा लहान मोठ्या आजारांवर वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावला जातो. ही परिस्थिती लक्षात घेवून आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मागील सात वर्षांपासून आरोग्य शिबिर राहविले जात आहे. यंदाही कान्हे येथील नवीन उपजिल्हा रुग्णालय ठिकाणी महाआरोग्यशिबिर आयोजित करण्यात आले होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना धरणग्रस्तांना प्रत्येकी दोन एकर नाही तर चार एकर जमीन मिळावी’ । Pavana Dam News
– जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत खोपोलीतील कारमेल स्कूलचे वर्चस्व । Khopoli News
– एकविरादेवी नवरात्रोत्सव दरम्यान रिक्षा चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे ; लोणावळा पोलिसांच्या सुचना

