Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरातील विकासात्मक कामांची आढावा बैठक सोमवारी (दि.30) नगरपरिषद सभागृहात संपन्न झाली. आमदार सुनिल शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीत शहरातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत चर्चेला आलेले प्रमुख मुद्दे ;
•हिंदमाता भुयारी मार्गापुढील अपुर्ण रस्त्याचा प्रश्न चर्चा करुन आठ दिवसात मार्गी लावावा.
• नगरपरिषदेच्या नवीन इमारतीस पूर्वीचे नाव डॉ. हेडगेवार भवन व सभागृहास सरसेनापती खंडेराव दाभाडे सरकार, सरसेनापती उमाबाई दाभाडे सरकार यापैकी नाव देण्याबाबत, तसेच वरील मिटींग हॉलला थोर समाजसेवक स्व.नथूभाऊ भेगडे पाटील यांचे नाव देण्याबाबत सर्वांनी सहमती दर्शविली.
• मारुती मंदिर ते खडकमोहल्ला व जिजामाता चौक ते गणपती मंदिरापर्यंत मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांचे रुंदीकरण करणेसाठी जागा मालकांची संमती मिळाली तर त्यांना TDR/FSI मोबदला देऊन सुमारे ३.५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली.
• स्टेशन भागातील इंद्रायणी कॉलेज ते वराळे फाटा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ५ कोटी रुपये निधी देणार.
• शहरातील मुख्य डीपी रस्ते खुले करण्याबाबत निर्णय घ्यावा, वाहतूक कोंडीतून नागरिकांना मुक्तता मिळण्यास मदत होईल. नगरपरिषद इमारत ते काळोखेमळा / करंडेवस्ती शेतकऱ्यांच्या संमती घ्याव्यात.
• स्मशानभूमी परिसर सुधारणेसाठी नगरपरिषदेने तात्काळ प्रस्ताव सादर करावा. अंदाजे ६ ते ७ कोटी रुपयांचा खर्च सदर प्रस्तावानुसार असून त्याबाबत चर्चा करण्यात आली.
• तळेगाव स्टेशन परिसरात आंद्रा धरणातून बंद पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा योजना राबविणेसाठी नगरपरिषदेने पाणी आरक्षणाचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर करून मंजुरी घ्यावी, उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार साहेब या कामांसाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन देणार आहेत.
• जुना मुंबई-पुणे महामार्ग ते टेलिफोन एक्सचेंज (मंत्रा सिटी) रस्त्याला कै.काकासाहेब खळदे नाव देण्यात यावे.
• तळेगाव–चाकण रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न असून पुर्वीचा रस्ता जेवढा रुंद आहे. तेवढाच रस्ता करावा,अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
• तळेगाव दाभाडे शहरालगत माळवाडी, सोमाटणे, थंडा मामला हॉटेल मागील भाग नगरपरिषदेत समाविष्ट करण्यासाठी हद्दवाढीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केलेला असून त्याची मान्यता घेण्यासाठी पाठपुरावा करावा.
• शहराच्या सुरक्षिततेसाठी इंद्रायणी महाविद्यालय, बालविकास व आदर्श विद्यालये, शाळांसह, शहरातील मुख्य चौक व बाजारपेठ अशा एकूण ६५ मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याच्या कामांना गती द्यावी.
• मामासाहेब खांडगे क्रीडांगण उभारणार असून त्यासाठी ५ कोटी निधी उपलब्ध करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
• रविवार आठवडे बाजाराची जागा बदलणेबाबत संबंधित व्यापारी, शेतकरी व नागरिक यांनी निर्णय घेण्याबाबत आवाहन करण्यात आले.
• रजिस्टर ऑफिस शॉपिंग सेंटरमध्ये घ्यावे याबाबत चर्चा करण्यात आली.
या आढावा बैठकीला आमदार सुनिल शेळके यांसह मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब जांभूळकर, माजी नगराध्यक्षा अंजलीराजे दाभाडे सरकार, सत्येंद्रराजे दाभाडे सरकार, गणेश खांडगे, सुरेश चौधरी, सुरेश धोत्रे, कृष्णा कारके, यादवेंद्र खळदे, रविंद्र दाभाडे, अशोक भेगडे, सुदर्शन खांडगे, दिलीप खळदे, अरुण माने, सुर्यकांत काळोखे, अरुण भेगडे, जयंतराव कदम, संजय बाविस्कर, बाबा मुलाणी, विनय दाभाडे, आयुब सिकीलकर, शैलजा काळोखे, सामाजिक संस्था, नगरपरिषदेचे अधिकारी, आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, नागरिक व पत्रकार बंधु-भगिनी उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील सामाजिक सलोखा जपणे सगळ्यांची जबाबदारी – आमदार सुनिल शेळके
– नवनवीन व्यवसाय उभारून खरेदी विक्री संघ बळकट करा, सहाय्यक निबंधक सर्जेराव कांजळकर यांचे आवाहन । Vadgaon Maval
– तळेगावमधील सार्वजनिक गणेशोत्सव 2024 स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न । Talegaon Dabhade