Dainik Maval News : राज्यातील सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय सोमवारी (दि.30 सप्टेंबर) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळातर्गंत हे महामंडळ असेल.
या महामंडळाचे (उपकंपनी) मुख्यालय मुंबई येथे राहील. तसेच संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाच्या योजना या उपकंपनीमार्फत राबवण्यात येतील. या उपकंपनीस पन्नास कोटींचे भागभांडवल देण्यात येईल. तसेच सोळा पदे भरण्यात येतील.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देशी गायीला ‘राज्यमाता – गोमाता’ दर्जा देण्याचा शिंदे सरकारचा निर्णय ; गायींच्या पालन पोषणासाठी मिळणार अनुदान
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून ऑक्टोबर दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– मावळ तालुक्यातील सामाजिक सलोखा जपणे सगळ्यांची जबाबदारी – आमदार सुनिल शेळके