Dainik Maval News : शिक्षक विद्यार्थ्यांना जीवनभर शिकणारे बनण्यासाठी प्रेरणा देऊन विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण करतात, असे आमदार जयंत आसगावकर म्हणाले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शिरूर तालुका यांच्या वतीने मावळ तालुक्यातील पाच शिक्षकांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक आमदार जयंत आसगावकर बोलत होते.
विद्याधाम प्रशाला, शिरूर या ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला. मावळ तालुक्यातील मुख्याध्यापक पांडूरंग पोटे, उपशिक्षक धनंजय नांगरे, देवराम पारिठे , राजेंद्र भांड व वैशाली वराडे यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी पुणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार भगवानराव साळुंखे, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, मुंबई सेकंडरी पतसंस्थेचे संचालक सुधाकर जगदाळे उपस्थित होते.
तसेच, गुलाबराव गवळे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष निलेश काशिद, उपाध्यक्ष भाऊसाहेब खोसे, कार्यवाह महेश शेलार, मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण मखर, कार्याध्यक्ष भारत काळे , विलास भेगडे,राम कदमबांडे, धनकुमार शिंदे, रियाज तांबोळी, शिक्षकेतर संघटनेचे माजी अध्यक्ष संजय कसाबी, दिलीप पोटे,समीर गाडे,दिलीप हेरोडे, विनोद भोसले, दत्तात्रय ठाकर,संपत गोडे, दत्तात्रय घरदाळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना आसगावकर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू मनाला शिक्षक मदत करतात. ते प्रत्येक विद्यार्थ्यामधील सर्वोत्कृष्ट गोष्टी बाहेर आणतात, त्यांना कठीण प्रश्न आणि आव्हानांमधून मार्गदर्शन करतात जेणेकरून त्यांना जग अधिक स्पष्ट, अधिक अंतर्ज्ञानी प्रकाशात पाहण्यात मदत होईल. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मावळ तालुक्यातील ५ शिक्षकांसह जिल्ह्यातील ६३ शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अजित पवारांच्या हस्ते शुक्रवारी मावळात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण, पाहा संपूर्ण कार्यक्रमपत्रिका
– टाकवे बुद्रुक गावात पारंपारिक पद्धतीने बैलपोळा साजरा ! बैलाच्या कपाळावरील नारळ तोडण्यासाठी तरूणाईत स्पर्धा । Bail Pola 2024
– वंदन दुर्गांना । “योगसाधनेतून घडली आंतरराष्ट्रीय योगप्रशिक्षक” : मनाली देव यांचा प्रेरणादायी ‘जीवनयोग’ । International Yoga Instructor Manali Dev