Dainik Maval News : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली कार्ला येथील एकविरा देवी ही महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कुलस्वामिनी आहे. त्यामुळे सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील नवरात्र उत्सवानिमित्त ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाहून रश्मी ठाकरे यांच्याकडून देवीला खण आणि नारळाची ओटी अर्पण करण्यात आली आहे.
पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, पनवेल तालुका संघटक मुरलीधर म्हात्रे, गणेश म्हात्रे, अभिमन्यु गोरे हे ही ओटी घेऊन आले होते. ठाकरे परिवाराची कुलस्वामिनी असलेल्या एकविरा देवीच्या दर्शनासाठी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ठाकरे परिवारातील कुटुंबीय दरवर्षी येत असतात.
एकविरा देवीसाठी ओटी घेऊन आलेल्या बबन पाटील यांचे स्वागत एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दिपक हुलावळे, माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, वरीष्ठ उपाध्यक्ष मारुती देशमुख, सचिव नवनाथ देशमुख, बाळासाहेब भानुसघरे, संदिप आंद्रे यांनी स्वागत केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वंदन दुर्गांना । पोरक्या कुटुंबाला सावरण्यासाठी ती बनली वाहक, ‘पीएमपी’च्या आदर्श ‘कंडक्टर’ आरतीताई । Aarti Shinde
– महाराष्ट्रात 3 ऑक्टोबर हा दिवस ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा होणार ; शिंदे सरकारचा निर्णय
– मावळमधील सुदुंबरे येथील श्री संत संताजी जगनाडे महाराज समाधी मंदिराचे भूमिपूजन ; एकूण 66 कोटींचा निधी मंजूर