Dainik Maval News : भारताचे प्रसिद्ध उद्योगपती (visionary industrialist) रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा (Ratan Tata) यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. भारत सरकारने रतन टाटा यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केले होते. ( Industrialist Ratan Tata Dies )
टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी बुधवारी (9 ऑक्टोबर) मध्यरात्री जारी केलेल्या निवेदनात म्हटलं की, “आम्ही रतन नवल टाटा यांना निरोप देत आहोत, त्यांचं नेतृत्व खरोखर असामान्य होतं. त्यांच्या अतुलनीय योगदानामुळे केवळ टाटा समूहच नाही तर आपल्या राष्ट्राची रचना देखील घडली आहे.”
उद्योगपती रतन टाटा यांची कारकीर्द –
1. 1991 मध्ये रतन टाटा हे टाटा समूहाचे अध्यक्ष झाले आणि शंभर वर्षांपूर्वी त्यांच्या आजोबांनी स्थापन केलेल्या टाटा समूहाचे ते 2012 पर्यंत अध्यक्ष होते.
2. 1996 मध्ये दूरसंचार कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेसची स्थापना केली आणि 2004 मध्ये आयटी क्षेत्रातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही कंपनी सार्वजनिक केली.
3. 2009 मध्ये, रतन टाटा यांनी मध्यमवर्गीयांसाठी जगातील सर्वात स्वस्त कार उपलब्ध करून देण्याचे वचन पूर्ण केले. ₹ 1 लाख किंमतीची टाटा नॅनो ही मध्यमर्गीयांसाठीची कार त्यांनी बाजारात आणली होती.
4. रतन टाटा हे टाटा समूहाचे 1991 ते 2012 आणि 2016 ते 2017 या काळात दोनदा अध्यक्ष होते.
पंतप्रधान मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली –
पंतप्रधान नरेंद मोदी यांनीदेखील एक्स (ट्विटर) पोस्ट करून रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे. “रतन टाटा यांच्याशी झालेल्या असंख्य संवादांनी माझे मन भरून आले आहे. मी मुख्यमंत्री असताना त्यांना गुजरातमध्ये वारंवार भेटत असे. आम्ही विविध मुद्द्यांवर विचार विनिमय करत असू. मला त्यांचा दृष्टीकोन खूप समृद्ध वाटला. मी दिल्लीत आलो तेव्हाही हे संवाद सुरूच होते. त्यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले आहे.”
Shri Ratan Tata Ji was a visionary business leader, a compassionate soul and an extraordinary human being. He provided stable leadership to one of India’s oldest and most prestigious business houses. At the same time, his contribution went far beyond the boardroom. He endeared… pic.twitter.com/p5NPcpBbBD
— Narendra Modi (@narendramodi) October 9, 2024
राहुल गांधी यांनी वाहिली श्रद्धांजली
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ट्विटरवर पोस्ट करत त्यांनी लिहिले की, “रतन टाटा यांच्याकडे दूरदृष्टी होती. व्यवसाय आणि परोपकाराच्या क्षेत्रात त्यांनी आपली छाप सोडली आहे.”
Ratan Tata was a man with a vision. He has left a lasting mark on both business and philanthropy.
My condolences to his family and the Tata community.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 9, 2024
शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी देखील रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एक्सवर पोस्ट करून शरद पवारांनी रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे. “जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील.”
जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 9, 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली
उद्योगपती रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे,. “नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम रतनजी टाटा यांच्या ठायी होता. सुमारे १५० वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारे रतनजी टाटा हे एक जिवंत आख्यायिका होते. त्यांनी वेळोवेळी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कणखरपणी टाटा ग्रूपला वेगळ्या औद्योगिक उंचीवर घेऊन गेला. त्यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो.” असे त्यांनी एक्सवर लिहिले आहे.
दुर्मिळ रत्न हरपले
नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम रतनजी टाटा यांच्या ठायी होता. सुमारे १५० वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारे रतनजी टाटा हे एक जिवंत आख्यायिका होते. त्यांनी वेळोवेळी दाखविलेला निर्णायक… pic.twitter.com/6O1KmyJkyj
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 9, 2024