Dainik Maval News : राज्यात विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या असून आचारसंहिता देखील लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन होण्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यक्षेत्रातील शासकीय संपत्तीच्या भिंतीवरील तसेच इतरत्र असलेले अनधिकृत पोस्टर, बॅनर काढून घेण्याबाबत मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी आदेश बजाविला आहे.
तळेगाव नगरपरिषद कार्यक्षेत्रातील शासकीय संपत्तीच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, पेपर्स किंवा कटआउट, होर्डिंग, बॅनर्स, झेंडे तसेच शासकीय बसेस वरील पक्षाच्या जाहिराती, सार्वजनिक ठिकाणे जसे रेल्वे स्टेशन, बस स्टँन्ड, रेल्वेपूल, रस्ते, इलेक्ट्रिक, टेलिफोन खांब, नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेची इमारत इत्यादी ठिकाणी निवडणूक जाहीर झाल्यानंतर तत्काळ काढून टाकण्याची जबाबदारी बीट निरीक्षक, आरोग्य निरीक्षकस अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांची असल्याची सूचना केली आहे.
आदेशाच्या कार्यवाहीसाठी तळेगाव गावभाग व स्टेशन असे दोन बीट निर्माण केले असून यामध्ये नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत. सदर कार्यवाही होण्याअगोदर तळेगावकर नागरिकांनी आपल्या जागेत असलेले अनाधिकृत पोस्टर्स, बॅनर्स काढून घ्यावेत असे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अवघ्या दोन सेकंदाच्या व्हिडिओमुळे लागला ‘त्याचा’ शोध ; शिवदुर्ग रेस्कू टीमच्या अनुभवाचा कस पाहणारे सर्च ऑपरेशन यशस्वी !
– ‘मी दुर्गा’ बेस्ट सेल्फी आणि रिल्स स्पर्धेतील विजेत्या प्रतिभा थोरात यांचा सन्मान । Vadgaon Maval
– कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात? कोजागिरी शब्दाचा अर्थ काय? कोजागिरी पौर्णिमेला दूध का पितात? जाणून घ्या सर्वकाही