Dainik Maval News : दिनांक 19 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 3:30 वाजता पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर कि.मी. 73/700 जवळ मौजे बऊर गावच्या हद्दीत एसटी बस (MH 14 BT 4258) आणि ट्रक (MH 12 PQ 8748) यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात विश्वास भगवान वाघमारे (वय 42) यांचा मृत्यू झाला असून, इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
फिर्यादी संगिता रविंद्र उबाळे (वय 47 वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एसटी बसचा चालक नवनाथ बाबासाहेब आकोलकर (रा. करंजी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) याने बस भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवून समोर चाललेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत एसटी बसमधील प्रवासी संगिता रविंद्र उबाळे, छगुबाई भगवान वाघमारे, वैशाली विश्वास वाघमारे, वाहक सचिदानंद रमेश खंडागळे, बाळु रावसाहेब गायकवाड, काजल बाळु गायकवाड, रंजना प्रल्हाद वाघमारे, बबनबाई चंद्रकांत वाघमारे आणि राहुल शंकर जाधव हे गंभीर जखमी झाले. ( Accident between ST bus and truck on Pune Mumbai Expressway One dead )
विशेषतः विश्वास भगवान वाघमारे (वय 42) यांना गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात एसटी बस आणि ट्रकचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 207/2024 नुसार भारतीय दंड संहितेच्या कलम 106(1), 281, 125(ए), 125(बी), 324(4) आणि मोटार वाहन कायदा 184 अंतर्गत करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि सुनील पोवर करत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी पदी सोमनाथ ताकवले यांची नियुक्ती, एस.डी. वरक यांच्याकडून स्वीकारला कार्यभार
– रेल्वेत हरवलेली बॅग पुन्हा हाती आली आणि तीचे दुःख हरवले ! रेल्वे पोलीस अनिता रायबोले यांना सॅल्यूट
– ब्राम्हणोली येथील शेतकऱ्यांचा विषमुक्त शेती प्रशिक्षण शिबिरात सहभाग । Maval News