व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गोडुंब्रे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच अपात्र ! दाखल प्रकरणाच्या सुनावणीनंतर जिल्हाधिकारी यांचा आदेश । Maval News

मावळ तालुक्यातील गोडुंब्रे ग्रामपंचायतीच्या सरपंच निशा गणेश सावंत यांचे सदस्य पद रद्द केल्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 20, 2024
in लोकल, ग्रामीण
Gram-Panchayat

File Image


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील गोडुंब्रे ग्रामपंचायतीच्या सरपंच निशा गणेश सावंत यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केल्याने त्यांचे सदस्य पद रद्द केल्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिला आहे. मंगळवार (दि. 10 सप्टेंबर) त्यांनी हा आदेश दिला. याबाबत शुक्रवारी (दि. 11) अर्जदार आणि जाब देणार यांना आदेशपत्र देण्यात आले.

गोडुंब्रे येथील लोकनियुक्त सरपंच निशा सावंत यांच्या निवडीनंतर त्यांच्या सदस्यत्व आणि सरपंच पदाला आव्हान देण्यात आले होते. गोडुंब्रे येथील अर्जदार कल्पना हेमंत सावंत यांनी लोकनियुक्त सरपंच निशा गणेश सावंत यांच्या विरोधात 10 जानेवारी 2023 रोजी अर्ज केला होता. अर्जात, ग्रामपंचायत गोडुंब्रे येथील लोकनियुक्त सरपंच निशा गणेश सावंत यांनी सरकारी जागेत अतिक्रमण केल्यामुळे त्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 14(1) (ज-3) अन्वये अपात्र करण्याची मागणी करण्यात आली होती.

जिल्हाधिकारी यांच्याकडे सदर विवाद अर्जाच्या अनुषंगाने सविस्तर सुनावणी पार पडली. यात सर्व संबंधितांना नोटीसा काढून सुनावणी निश्चित करुन अर्जदार व जाब देणार यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी पुरेशी संधी उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर सदरहू विवाद अर्जाबाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 16 (2) अन्वये जिल्हाधिकारी पुणे यांनी मंगळवार, दि. 19 सप्टेंबर 2024 रोजी आदेश दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालपत्रातील आदेशात, जाब देणार निशा गणेश सावंत यांना ग्रामपंचायत गोडुंब्रे (ता. मावळ) येथील ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदी राहण्यास अपात्र ठरविण्यात आल्याचे म्हटले आहे. हा आदेश तहसीलदार मावळ, गटविकास अधिकारी मावळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे आणि ग्रामसेवक गोडुंब्रे यांना पाठविण्यात आला आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी पदी सोमनाथ ताकवले यांची नियुक्ती, एस.डी. वरक यांच्याकडून स्वीकारला कार्यभार
– रेल्वेत हरवलेली बॅग पुन्हा हाती आली आणि तीचे दुःख हरवले ! रेल्वे पोलीस अनिता रायबोले यांना सॅल्यूट
– ब्राम्हणोली येथील शेतकऱ्यांचा विषमुक्त शेती प्रशिक्षण शिबिरात सहभाग । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

मावळ विधानसभा : “दादांच्या राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांची…” आमदार सुनिल शेळके यांचा इशारा

Next Post

लोणावळ्यात संत तुकाराम साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटप । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Distribution of sugar to member farmers of Sant Tukaram Sugar Factory in Lonavala

लोणावळ्यात संत तुकाराम साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटप । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.