Dainik Maval News : ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला मतदारसंघ हे महायुतीचे जागा वाटपाबाबत प्राथमिक सुत्र आहे. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे त्यांच्या राजकीय बंडात ज्या ज्या आमदारांनी समर्थपणे साथ दिली, त्यांना फिक्स उमेदवारी देणार असल्याचे समजते. अजित पवार हे त्यांच्या 2019 आणि 2023 अशा दोन्ही सालच्या राजकीय बंडात सोबत राहिलेल्या मावळचे आमदार सुनिल शेळके, यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यावर ठाम असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु पक्षांतर्गत असलेल्या मतभेदांमुळे आणि उमेदवारीसाठी इच्छुक इतर चेहऱ्यांमुळे उमेदवारीचा निर्णय घेण्यात उशीर होत असल्याचे समजते.
मावळ विधानसभेची जागा ही महायुतीत अजित पवार यांच्या पक्षाला सुटणार हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. यामुळे भाजपाच्या स्थानिक नेत्यांमध्ये चलबिचल सुरू आहे. दुसरीकडे आमदार सुनिल शेळके हे मात्र दुसऱ्यांदा विधानसभा लढविण्यासाठी तयारीत आहेत. त्यांच्या कार्यकर्ते, समर्थकांकडून तशी तयारी आहे. आमदार सुनिल शेळके यांच्यासमोर महत्वाचे आवाहन हे सध्या पक्षातून इच्छुक असलेल्या इतर उमेदवारांचे त्यातही बापूसाहेब भेगडे यांचे आहे. मात्र बापूसाहेब भेगडे यांच्या उमेदवारीचा प्रश्न पक्षीय पातळीवर मिटविला गेल्यास आमदार शेळके यांच्या उमेदवारीचा दुसरा कोणताही अडसर सध्या तरी दिसत नाही. स्वतः अजित पवार हे सुनिल शेळके यांच्या पाठीशी ठाम असल्याचे समजते.
अजित पवार यांच्याकडून सुनिल शेळके यांना उमेदवारी देण्याची खास कारणे –
1. अजित पवार यांच्या 2019, 2023 च्या बंडात सुनिल शेळकेंची साथ
2. अजित पवारांच्या पक्षात सुनिल शेळके राज्य युवक प्रभारी म्हणून कार्यरत
3. सुनिल शेळके हे पक्षाचा राज्यव्यापी आणि लोकप्रिय चेहरा म्हणून प्रसिद्ध
4. पक्षासाठी त्यांनी चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक, लोकसभेत प्रचारक म्हणूक काम केले.
5. सुनिल शेळके यांना अजित पवारांनी 5000 कोटी निधी दिला, यातून मावळ विकासाचे मॉडेल म्हणून समोर
6. अजित पवारांच्या प्रत्येक कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात सुनिल शेळके अग्रेसर
वरील कारणांमुळे अजित पवारांचा सुनिल शेळके यांच्यावर विशेष लोभ असून सुनिल शेळके हे दुसऱ्यांदा निवडणूकीच्या रिंगणातत उतरल्यास ते निश्चित विजयी होतील, असे अजित पवार यांना वाटते. पक्षात बंड केल्यानंतर अस्तित्वाची लढाई असलेल्या या विधानसभेत प्रत्येक जागा महत्वाची असल्याने निवडून येण्याच्या शक्यतेवर मावळात अजित पवार सुनिल शेळकेंना दुसऱ्यांदा उमेदवारी देणार, हे जवळपास निश्चित मानले जाते आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ उत्साहात
– निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने पक्ष, नेते, कार्यकर्ते सर्वांसाठीच नियमावली जाहीर ; वाचा नियमावली सविस्तर । Pune News
– पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर एसटी बस आणि ट्रक यांचा अपघात – एकाचा मृत्यू, इतर प्रवासी जखमी । Kamshet News