मावळ तालुक्याच्या राजकारणात आज (दि.२३) मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बापूसाहेब भेगडे यांच्या राजीनाम्याने मोठा हादरा बसला, त्यानंतर आता भारतीय जनता पार्टी पक्षालाही मोठा धक्का बसला आहे. भारतीय जनता पार्टी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, मावळ भाजपाचे वरिष्ठ नेते, राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यासोबत पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
मावळ विधानसभा मतदारसंघातून आज, बुधवारी (दि.२३ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर झाली. यासह सुनील शेळके हेच मावळात महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील, हेही स्पष्ट झाले. दुसरीकडे ही जागा राष्ट्रवादीकडे गेल्याने आणि सुनील शेळके यांनाच उमेदवारी मिळाल्याने भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत. त्यातूनच आता पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी समोर येत आपले राजीनामे जाहीर केले आहेत. भारतीय जनता पार्टी साठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
यासह, पत्रकार परिषदेत बोलताना बाळा भेगडे यांनी आपण अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कान्हे – नायगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पुजा चोपडे यांची निवड । Kanhe News
– अबब ! पुणे जिल्ह्यात 3 हजार 677 नागरिकांकडे शस्त्रांचा परवाना ; पावणेचार हजार शस्त्रे जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
– परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन, नुकसानग्रस्तांना भरपाई द्या – मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश