व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तिकीट जाहीर होताच सुनिल शेळकेंनी घेतले पोटोबा महाराजांचे दर्शन ; गुरुवारी हजारो समर्थकांच्या साक्षीने भरणार उमेदवारी अर्ज

'महायुतीचे सरकार पुन्हा आणण्यासाठी एकजुटीने काम करू' - सुनिल शेळके

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 23, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Sunil Shelke has been announced candidate for Maval Vidhan sabha by NCP

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बुधवारी दुपारी पक्षाच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर झाली. यात आमदार सुनिल शेळके यांनाच दुसऱ्यांदा मावळची आमदारकी जाहीर कऱण्यात आली. आमदार सुनिल शेळके यांना अधिकृतरित्या राष्ट्रवादीची अर्थात महायुतीची उमेदवारी जाहीर होताच, त्यांच्या समर्थकांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. तसेच आमदार शेळके हेही वडगाव मावळ ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरात आले, आणि पोटोबा महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

यावेळी आमदार सुनिल शेळके यांनी माध्यमांशी बोलताना आपली पहिली प्रतिक्रिया दिली. ‘गेल्या पाच वर्षांत आपण मावळच्या जनतेची मनोभावे अहोरात्र सेवा केली. मावळचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळेच मावळची जनता आजही माझ्याबरोबर आहे. त्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मला मावळच्या जनतेची सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे व पक्षाच्या सर्व नेत्यांचे, त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महायुतीच्या सर्व नेत्यांचे मी आभार मानतो,’ असे आमदार शेळके म्हणाले.

राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आणण्यासाठी मावळ तालुक्यातील महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मिळून एकजुटीने प्रयत्न करणार आहोत. तालुक्यातील सर्व पक्षांचे ज्येष्ठ नेते, इच्छुक उमेदवार, प्रमुख कार्यकर्ते, संघ परिवार तसेच विविध संस्था, संघटनांचे प्रमुख पदाधिकारी या सर्वांना भेटून या निवडणुकीतही सहकार्य करण्याची विनंती करणार आहे, असे शेळके यांनी सांगितले.

महायुतीचा उमेदवार म्हणून उद्या सकाळी (गुरुवार, 24 ऑक्टोबर) वडगाव मावळ येथील तहसीलदार कार्यालयात अर्ज दाखल करणार आहे. त्यावेळी महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते, माझ्यावर प्रेम करणाऱ्या मावळातील सर्व माता-भगिनी व बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून मला आशीर्वाद द्यावेत, अशी विनंती आमदार शेळके यांनी केली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात राष्ट्रवादीला मोठा धक्का ! बापूसाहेब भेगडे यांच्याकडून पदाचा राजीनामा
– राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर ! मावळ विधानसभेतून आमदार सुनिल शेळके यांना दुसऱ्यांदा उमेदवारी, पाहा संपूर्ण यादी
– मावळच्या राजकारणात मोठा भूकंप ! बाळा भेगडे यांच्याकडून पदाचा राजीनामा, बाळाभाऊंसोबत भाजपाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे


dainik maval jahirat

Previous Post

मावळच्या राजकारणात मोठा भूकंप ! बाळा भेगडे यांच्याकडून पदाचा राजीनामा, बाळाभाऊंसोबत भाजपाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Next Post

मोठी बातमी ! वडगाव शहरातील आठवडी बाजार आज बंद, उमेदवारी अर्ज भरताना होणाऱ्या संभाव्य गर्दीमुळे निर्णय – वाचा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
athavdi-bajar

मोठी बातमी ! वडगाव शहरातील आठवडी बाजार आज बंद, उमेदवारी अर्ज भरताना होणाऱ्या संभाव्य गर्दीमुळे निर्णय - वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.