Dainik Maval News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तथा महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान आमदार सुनिल शेळके यांनी आज, गुरुवारी (दि.24 ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी वडगाव मावळ शहरात आमदार सुनिल शेळके यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. हजारो शेळके समर्थकांचा मेळा जणू वडगाव मावळ शहरात जमला होता. प्रमुख चार जिवाभावाच्या आणि प्रमुख सहकाऱ्यांच्या उपस्थितीत सुनिल शेळके यांनी त्यांचे मावळ विधानसभा मतदारसंघ साठीचे नामनिर्देशन पत्र दाखल केले.
मावळ विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी त्यांचे नामनिर्देशन पत्र स्विकारले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विक्रम देशमुख हेही उपस्थित होते. तर सुनिल शेळके हे उमेदवारी अर्ज भरत असताना त्यांच्या सोबत ज्येष्ठ नेते माऊलीभाऊ दाभाडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे आणि अन्य एक ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
आतापर्यंत 16 उमेदवारांना अर्जांची विक्री –
निवडणूक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, 204 मावळ विधानसभा मतदार संघ करिता गुरुवारी, दिनांक 24 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 3 वाजे पर्यंत 3 उमेदवारांना 6 नामनिर्देशन पत्राची विक्री करण्यात आली यासह आज अखेर एकूण 16 उमेदवारांना 33 अर्जांची विक्री करण्यात आली आहे. तसेच दिनांक 24 ऑक्टोबर 2024 रोजी नामनिर्देशन सादर /प्राप्त झालेली उमेदवार संख्या 2 असून नामनिर्दशन पत्र दाखल संख्या (एकूण) 3 आहे. उद्या नामनिर्देश सादर करण्याचा चौथा दिवस आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळच्या राजकारणात मोठा भूकंप ! बाळा भेगडे यांच्याकडून पदाचा राजीनामा, बाळाभाऊंसोबत भाजपाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
– मावळात राष्ट्रवादीला मोठा धक्का ! बापूसाहेब भेगडे यांच्याकडून पदाचा राजीनामा
– राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर ! मावळ विधानसभेतून आमदार सुनिल शेळके यांना दुसऱ्यांदा उमेदवारी, पाहा संपूर्ण यादी