Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या गटाचे आमदार सुनिल शेळके यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही तासातच राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी पदाचा राजीनामा दिला. त्या पाठोपाठ भाजपाचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी देखील राजीनामा देऊन बापू भेगडे यांच्या अपक्ष उमेदवारीला अर्थात बंडखोरीला समर्थन दिले आहे.
मावळ विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांचे खंदे समर्थक आमदार सुनिल यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यानंतर गुरुवारी मोठे शक्तीप्रदर्शन करत शेळकेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु आमदार शेळके यांना आता विरोधीपक्षाचे अर्थात महाविकासआघाडीचे नाही तदर, महायुतीतून विरोध असल्यामुळे बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
विधानसभेच्या आधीपासूनच शेळके यांच्या उमेदवारीला भेगडेंचा विरोध होता. सुनिल शेळके यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांचा प्रचार करायचा नाही असा ठराव भाजपाने केला होता. 2 ऑगस्ट रोजी घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यातून शेळके यांच्या विरोधात प्रचार सुरू झाला होता. भाजपाचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि अपक्ष लढण्याची घोषणा केलेले बापू भेगडे यांनी सतत आमदार सुनिल शेळके यांच्या विरोधात भूमिका मांडत त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता.
त्यानंतर आता प्रत्यक्षात हे सर्वजण एकत्र येऊन सुनिल शेळकेंच्या समोर उभे ठाकले आहेत. बापूसाहेब भेगडे यांनी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. त्याला भाजपाचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. महायुतीतील हे बंड थंड होण्याचे नाव घेत नसून बापू भेगडे दोन दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला भाजपा देखील पाठिंबा देत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कान्हे येथील दुहेरी हत्याकांडातील प्रमुख आरोपीला जन्मठेपेची शिक्षा, वडगाव मावळ न्यायालयाचा निर्णय । Maval News
– मोठी बातमी ! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊलीभाऊ दाभाडे यांचे पक्षाकडून निलंबन, पक्ष शिस्त मोडून सुनिल शेळकेंना पाठींबा दिल्याने कारवाई
– मावळ विधानसभा क्षेत्रात मोठी कारवाई, तब्बल 17 लाख 75 हजारांची रोकड जप्त