Dainik Maval News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आल्यानंतर पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नेवाळे यांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. याबाबत स्वतः बाळासाहेब नेवाळे यांनी शनिवारी (दि.26) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तसेच यावेळी आपण भारतीय जनता पार्टी पक्षाचा राजीनामा देत असल्याचेही नेवाळे यांनी जाहीर केले.
आपल्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते तातडीने मागे घेण्यात यावेत, अशी मागणी करीत नेवाळे यांनी वडगाव मावळ येथे निषेध मेळावा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनिल शेळके यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच त्या सभेत सांगितल्याप्रमाणे नेवाळे हे आज, रविवारी कामशेत येथे जाहीर सभा घेणार होते. परंतु, तत्पूर्वी शनिवारीच त्यांनी पत्रकार परिषद घेत, रविवारची सभा स्थगित करीत असल्याचे माध्यमांना सांगितले.
भाजपाचा राजीनामा –
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल रात्री आपल्याला फोन आला व तुमचा प्रश्न सोडविण्याचा शब्द दिला. त्यामुळे दिवाळी होईपर्यंत थांबण्याचा आपण निर्णय घेतला आहे, अशी माहिती नेवाळे यांनी दिली. तसेच आपण भारतीय जनता पक्षाच्या पदाचा देखील राजीनामा दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेत कोणतेही त्यांनी कोणतेही राजकीय भाष्य करण्याचे टाळले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात महायुतीत बंडखोरी ! सुनिल शेळके यांच्या विरोधात अनेक दिग्गज एकत्र । Maval Vidhan Sabha
– मावळ तालुक्यातील ताजे गावातील सख्ख्या भावांची शासकीय सेवेत निवड । Maval News
– राज्यात 24 तासात 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त, विविध विभागांच्या पथकांची राज्यभर कारवाई