Dainik Maval News : मावळ विधानसभेतील राजकीय वातावरण आता चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मावळ भाजपाने महायुतीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनिल शेळके यांचा प्रचार करण्यास बाळा भेगडे आणि त्यांच्या काही सह पदाधिकाऱ्यांनी नकार दिला असून पदाचे राजीनामे दिले आहेत.
सुनिल शेळकेंना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे नाराज झालेले मावळ भाजपाचे प्रमुख नेते बाळा भेगडे यांनी पदाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवार बापू भगडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रविवारी (दि.27) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळा भेगडे यांची नाराजी दूर करण्यासाठी भेट घेतली. मात्र, फडणवीसांच्या भेटीनंतरही बाळा भेगडे हे राष्ट्रवादीतील बंडखोर उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचाच प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
महायुतीचे मावळचे उमेदवार सुनिल शेळके आणि भाजपाच्या बाळा भेगडे यांच्यातील नाराजी मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी बाळा भेगडे यांची भेट घेतली. मात्र बाळा भेगडे यांचे भेटीतून काही समाधान झाले नसल्याची माहिती मिळत आहे. तसेच बाळा भेगडे यांनी देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून आपण बापू भेगडेंचा प्रचार करण्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे.
तसेच सोमवारी (दि.28) बापूसाहेब भेगडे यांचा उमेदवारी अर्ज करताना बाळा भेगडे हे त्यांच्या समर्थकांसह उपस्थित होते. त्यांनी रॅलीत सहभाग घेवून बापू भेगडे यांनी सभेत जाहीर पाठींबा दिला. तसेच फडणवीस भेटीत घडलेला वृत्तांत सांगत सुनिल शेळके यांना माघार घेण्याचे आवाहन केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘आम्ही पक्षाचा आदेश मानणार, महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार’ ; तळेगाव भाजपा पदाधिकाऱ्यांचा सुनिल शेळकेंना पाठींबा
– मावळ विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत ‘या’ तीन उमेदवारांचे अर्ज दाखल । Maval Vidhan Sabha
– मावळात शरद पवारांचा अजितदादांना धक्का ! अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचं काम करण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश