Dainik Maval News : भारत निवडणूक आयोगाच्या आवाहनानुसार मावळ तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी ४३५ शाळांमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी १७ हजार विद्यार्थ्यांनी आई- बाबांकडून संकल्पपत्र भरून घेऊन मतदानाचे आवाहन केले.
ह्या उपक्रमांतर्गत वक्तृत्व स्पर्धा, विविध पथनाट्य, प्रभात फेरी, घोषवाक्य स्पर्धा, भेट कार्ड वाटप अशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच बस स्थानक एसटी स्थानक, उद्याने नाना नानी पार्क, औद्योगिक वसाहत, महिला मतदार, आजी आजोबांची भेट, युवांमध्ये मतदान जागृती केली.
तसेच मागील विधानसभेमध्ये ५० टक्के पेक्षा कमी मतदान झालेल्या केंद्रावर विशेष लक्ष केंद्रित करून मतदारांची जागृती करण्यात आली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी गटविकास अधिकारी के के प्रधान, सहायक गटविकास अधिकारी थोरात, गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज,नायब तहसीलदार जयश्री मांडवे यांनी सहकार्य केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– हजारोंची गर्दी… दमदार एन्ट्री… बापूसाहेब भेगडे यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज ! चार पक्षांचे तालुकाध्यक्ष उपस्थित
– मोठी घडामोड ! भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून रविंद्र भेगडे यांनीही भरला उमेदवारी अर्ज । Maval Vidhan Sabha
– उमेदवाराची ओळख : सुनिल शेळके यांचे शिक्षण किती? कौटुंबिक माहिती आणि राजकीय कारकीर्द, वाचा सविस्तर