व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील महिला आणि तरुणांमध्ये बापूसाहेब भेगडे यांच्या व्हिजनची चर्चा । Bapu Bhegade

बापूसाहेब भेगडे यांच्या व्हिजनची तालुक्यातील महिला, तरुणांमध्ये जोरदार चर्चा आहे. महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत असताना कायद्याची जरब निर्माण होणे गरजेचे आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 2, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Discussion of vision of Bapusaheb Bhegde among women and youth of Maval taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्याला सरदार दाभाडे राजघराणे, मदनजी बाफना, कृष्णरावजी भेगडे, स्वर्गीय रघुनाथदादा सातकर, स्वर्गीय ॲड. बी.एस. गाडे पाटील, रुपलेखाताई ढोरे, स्वर्गीय दिगंबरदादा भेगडे अशी मोठी राजकीय परंपरा आहे. त्यांनी आमदारकीच्या माध्यमातून तालुक्यात विकासाची गंगा आणली. नि:स्वार्थीपणे समाजसेवा केली. तालुक्याच्या विकासाला गती देत मुली, महिलांकडे कुणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, याची काळजी घेतली.

आता याच पंक्तीत मावळ विधानसभा मतदारसंघाचे सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचे नाव घ्यावे लागेल. कारण बापूसाहेब भेगडे यांनी मावळ तालुक्यातील मुली, महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेत तसे जाहीर वचन दिले आहे.

महिलांकडे कुणी वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करता कामा नये :
बापूसाहेब भेगडे यांच्या व्हिजनची तालुक्यातील महिला, तरुणांमध्ये जोरदार चर्चा आहे. महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत असताना कायद्याची जरब निर्माण होणे गरजेचे आहे. मुली, महिलांकडे कुणी वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करता कामा नये. जर कुणी असे करत असेल तर त्यांना तिथल्या तिथे धाक दाखवण्याची गरज असते.

बापूसाहेब भेगडे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना आयोजित सभेत बोलताना मुलींचे पालकत्व घेत असल्याचे जाहीर करीत पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा बहिणींना विश्वास दिला आहे.

बापूसाहेब भेगडे यांना वाढता पाठिंबा :
बापूसाहेब भेगडे यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. मावळ हे एक कुटुंब आहे. बापूसाहेबांच्या रुपाने महिलांना भाऊ भेटेल. लहान मुले व तरुणांना चांगला मामा मिळू शकणार आहे.

कोवळी मुले व्यसनाच्या आहारी :
गेल्या काही वर्षात मावळातील कोवळी मुले व्यसनाच्या आहारी गेल्याची, तसेच गुंडगिरी प्रवृत्ती निर्माण होत असल्याची परिस्थिती आहे. तालुक्याची संस्कृती बिघडून वेगळ्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. त्यामुळे महिलांच्या, मुलींच्या सुरक्षिततेची जबाबदारी बापूसाहेब भेगडे यांनी अगदी आनंदाने उचलली आहे.

अपप्रवृत्तीना जशास तसे उत्तर देणारा लोकप्रतिनिधी :
मावळ तालुक्यातील गावागावातील महिला वर्गाला आधार मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अपप्रवृत्तीना जशास तसे उत्तर देणारा लोकप्रतिनिधी हवा असल्याचे उघड बोलले जात आहे. आम्ही बापूसाहेब भेगडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास महिला देत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महायुतीचा मुख्यमंत्री होण्यासाठीच भाजपाचे कार्यकर्ते काम करतील ; सुनिल शेळके यांनी व्यक्त केला विश्वास
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून नोव्हेंबर दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– बापूसाहेब भेगडे हे मावळातील जनतेचे उमेदवार, त्यामुळे परिवर्तन अटळ – रामदास काकडे


dainik maval jahirat

Previous Post

मावळ हादरलं ! ऐन निवडणूकीच्या धामधुमीत भाजपा पदाधिकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या । Maval Crime

Next Post

लज्जा गौरी मोहीम : माळेगाव येथे सामुदायिक डोहाळे जेवण । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lajja Gauri Campaign Samudaik Dohale Jevan at Malegaon Maval News

लज्जा गौरी मोहीम : माळेगाव येथे सामुदायिक डोहाळे जेवण । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.