Dainik Maval News : सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु असून नागरिकांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. अशातच मावळ विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे दिवाळीनिमित्त मतदारसंघातील नागरिकांच्या सदिच्छा भेटी घेत असून त्यांचे आशीर्वाद घेत आहेत.
यादरम्यान भेठीगाठीत, आपला विजय निश्चित आहे, आम्ही महाविजयासाठी कटिबद्ध आहोत, असा विश्वास भेटीनिमित्त नागरिक बापूसाहेब भेगडे यांना देत आहेत. बापूसाहेब भेगडे यांच्या भेटीगाठीची सुरुवात तळेगाव स्टेशन येथील विठ्ठल मंदिरापासून झाली. मंदिरात काकडा सुरू असल्याने भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. विठ्ठलाची मनोभावे पूजा करीत सर्वांना चांगले आरोग्य, धनसंपदा दे, असे साकडे त्यांनी विठ्ठलाला घातले.
बापूसाहेब भेगडे यांनी नागरिकांच्या घरी सदिच्छा भेट देत आस्थेने चौकशी केली. ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी खळदे आळी, डोळसनाथ कॉलनी, बाजारपेठ, सुभाष चौक, माळी आळी, शुक्रवार पेठ, भेगडे आळी आदी ठिकाणी जात नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन आपल्याला मतदान करण्याचे आवाहन केले. सुवासिनींनी औक्षण केले. पेढे भरवून स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत बापूसाहेब भेगडे यांचे स्वागत केले.
तळेगावचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ मंदिर, श्री गणेश मंदिर, संत शिरोमणी गोरा कुंभार मंदिर, कानिफनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेऊन त्यांनी स्थानिक मतदार आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी मावळ विधानसभेचा आश्वासक आणि चौफेर विकास साधण्यावर बापूसाहेब भेगडे यांनी भाष्य केले.
दिवाळीचा शुभ उत्सव सुरू झालेला आहे. सर्वांना शुभेच्छा दिल्या. आज भेटीगाठीवर भर दिला आहे. मावळच्या पुढच्या 50 वर्षांचा विचार करून सुनियोजित विकासाचा आमचा संकल्प आहे. भूमीपुत्र म्हणून मला परिसराची संपूर्ण माहिती आहे. नगरसेवक म्हणून मी योग्य विकासकामे करून दाखवली आहेत. मावळ तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा संकल्प आहे. – बापूसाहेब भेगडे, अपक्ष उमेदवार, मावळ विधानसभा
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महायुतीचा मुख्यमंत्री होण्यासाठीच भाजपाचे कार्यकर्ते काम करतील ; सुनिल शेळके यांनी व्यक्त केला विश्वास
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून नोव्हेंबर दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– बापूसाहेब भेगडे हे मावळातील जनतेचे उमेदवार, त्यामुळे परिवर्तन अटळ – रामदास काकडे